Year Endear 2021 : दरवर्षी आपण अनके फूड ट्रेंड (food trends)पाहतो. यंदाही अशाच असाच एक फूड ट्रेंड ज्याची जागतिक स्तरावर चर्चा झाली तो म्हणजे गोल्ड प्लेटेड डिशेस.(Gold-plated dishes). खाद्य सोन्याचा (edible gold )वापर करून बनविलेले पदार्थांना गोल्ड प्लेटेड डिशेस असे म्हटले जाते. छोट्या रेस्टॉरंट्सपासून मोठ्या हॉटेलपर्यंत काहींनी ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी खाद्य सोने (edible gold) वापरून छान छान पदार्थ बनविले. शिवाय, या गोल्ड प्लेटेड डिशेस (Gold-plated dishes)ला सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रियता मिळाली. 2021 मध्ये लोकप्रिय ठरलेल्या काही गोल्ड प्लेटेड डिशेस( Gold-plated dishes
22-कॅरेट सोन्याचा वडा पाव (22-karat Gold Vada Pav)
दुबईतील ओ'पाओ (O'Pao) रेस्टॉरंटने जगातील पहिला 22-k सोन्याचा वडा पाव(22-karat Gold Vada Pav ) बनविला आहे. रेस्टॉरंटने 2021 मध्ये त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर लॉन्च करण्याची घोषणा केली आणि या अनोखा सोन्याचा वडा पावामध्ये Gold Vada Pav काय हे बनवितानाची झलक दाखवली होती. त्यानुसार रेस्टॉरंटने पोस्ट केलेल्या इंस्टाग्राम रीलमध्ये, विदेशी वडा पाव एका सुशोभित लाकडी पेटीत येतो. हा वडा बेसन पीठाचे आवरण असलेला, ट्रफल बटर आणि चीजने भरलेला दिसत आहे आणि नंतर 22 कॅरेट खाद्य सोन्याचा शेवटचा थर दिला जातो. वडा पाव रताळे फ्राईज आणि पुदिना युक्त लिंबूपाण्यासोबत सर्व्ह केला आहे. या वडा पावाची किंमत 99 AED (युनायटेड अराम एमिरेट्स दिरहाम) आहे, जी भारतीय चलनात अंदाजे 2000 रुपये (1,966.43 INR) आहे.
फेरेरो रोचर पान एडीएबल गोल्ड वर्क (Ferrero Rocher Paan with Edible Gold Varq)
दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये स्थित असलेले 'यमूज् पंचायत' (Ymu's Panchayat), भारतातील पहिले पान पार्लर सुरु केले आहे जे 'फेरेरो रोचर पान एडीएबल गोल्ड वर्क' हा पदार्थ विकत आहे. या पानाच्या व्हायरल व्हिडिओनुसार, या पानामध्ये क्लोरोफिलचा समावेश आहे जो उर्जेचा एक चांगला स्रोत देखील आहे. सुपारीच्या पानांव्यतिरिक्त, त्यात चूना ज्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते आणि काथ जो मानवी घशासाठी चांगला आहे. त्यात खजूर, नारळ पावडर, फेरेरो रोचर(Ferrero Rocher), केसर सिरप आणि खाण्यायोग्य सोन्याचे वर्क (Edible Gold Varq) आणि गोल्ड कोटेड वेलची (Gold coated cardamom)देखील वापरली आहे.
एडिएबल साडी (Ediable Saree)
कोल्लम येथे राहाणारी पीएचडी विद्यार्थिनी आणि होम बेकर (home baker) अॅना एलिझाबेथ जॉर्ज यांनी, पारंपारिक कासवूसारखी दिसणारी जगातील पहिली 100 टक्के खाण्यायोग्य साडी बनवली आहे. तिने साडीच्या बेससाठी स्टार्च बेस्ड वेफर पेपर वापरला आहे. हा वेफर पेपर बटाटा आणि तांदूाच्या स्टार्च बनलेला आहे. साडीची अचूक लांबी आणि रुंदी साकरण्यासाठी तिने प्रत्येकी A4शीट साईजचे 100 वेफर पेपर वापरले. तसेच गोल्डन जरी बॉर्डर लूक मिळवण्यासाठी तिने गोल्ड डस्ट लस्टर देखील वापरले.
फ्रेंच फ्राईज (चिप्स) (French Fries (chips)
युनायटेड स्टेट्समधील एका रेस्टॉरंट जगातील सर्वात महागडे फ्रेंच फ्राईज विकत आहे, ज्याची किंमत फक्त एका भागासाठी जवळपास १५ लाख हजार रुपये इतकी आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वेबसाइटनुसार, मॅनहॅटनमध्ये स्थित असलेले फास्ट फूड रेस्टॉरंट Serendipty3 ने 2021 मध्ये हे 'चीझी फ्रेंच फ्राईज - क्रेम दे ला क्रेम पोम्मे फ्राईट्स' बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. सोशल मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे फ्राईज अपस्टेट चिपरबेक बटाटे(Chipperbeck potatoes), डोम पेरिग्नॉन शॅम्पेन(Dom Perignon Champagne) आणि जे. लेब्लँक फ्रेंच शॅम्पेन आर्डेन व्हिनेगर(J. LeBlanc French Champagne Ardenne Vinegar), गुरेंडे ट्रफल सॉल्ट(Guerande truffle salt), अर्बनी समर ट्रफल ऑइल (Urbani summer truffle oil) आणि क्रेते सेनेसी पेकोरिनो टार्टुफेलो (Crete Senesi Pecorino Tartufello आणि 23कॅरट गोल्ड डस्च इडसह
(23k edible gold dust)वापरून बनविले जाते.
999.9 सोन्याची वीट (999.9 Fine Gold Brick)
गुरुग्राम आणि लखनौ येथील डिस्टिलरी रेस्टॉरंट आणि बार '999.9 फाइन गोल्ड ब्रिक विकत'' आहे पण, प्रत्यक्षात 24-कॅरेट खाण्यायोग्य सोन्याने बनविलेला तो 'पांढरा चॉकलेट ब्राउनी बेसअसलेला मँगो चीजकेक आहे. ही स्वीट डिश बनवFसाठी फिलाडेल्फिया क्रीम चीज, खाद्य सोने, मँगो प्युरी, साखर आणि हेवी क्रीम वापरली आहे. डिश तयार करण्यासाठी सुमारे 30-45 मिनिटे लागतात, त्यात तयारी आणि रेफ्रिजरेशनसाठी लागणारा वेळही समाविष्ट आहे.
नॉन- एडिएबल गोल्ड एवोकॅडो टोस्ट स्लपचर (Non-edible Gold Avocado Toast Sculpture)
टिम बेंगेल या जर्मन कलाकाराने एवोकॅडो टोस्टचे १८ कॅरेट सोन्याचे शिल्प बनवले आहे. या अनोख्या कलाकृतीचा व्हिडिओ कलाकाराने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या शिल्पात 27 वेगवेगळे भाग आहेत ज्यात दोन अर्धे बॅगेल, पाच टोमॅटोचे तुकडे, पाच कांद्याचे रिंग, पाच एवोकॅडो पट्ट्या आणि दहा अरुगुला लिव्हस यांचा समावेश आहे. व्हिडिओनुसार, कलाकृतीचे नाव आहे ''Who Wants To Live Forever?''या कलाकृतीचा जर्मनीतील बर्लिन आर्ट वीक प्रदर्शनामध्ये समावेश करण्यात आला होता. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.