Google आता अनेकांच्या जगण्याच्या अविभाज्य भाग झाले आहे. गुगलचे Gmail आता नव्या रुपात येणार आहे. गुगल Gmail साठी नवीन डिझाइन घेऊन येत आहे. नव्या रुपात डिझाइन केलेले Gmail हे Google Workspace साठी कंपनीच्या नव्या प्लॅनचा भाग आहे. नवीन डिझाइननंतर, जीमेल वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी Google Chat, Meet आणि Space असतील. (Google has announced that the company is coming with a new design for Gmail.)
1. नवीन जीमेलमध्ये यूजर्सना इंटिग्रेटेड व्ह्यू मिळेल. नवीन डिझाइन केलेले Gmail 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. म्हणजेच, तुम्हाला या वर्षी जुलैपूर्वी Gmail चा नवीन इंटरफेस पाहता येईल. Google Workspace नुसार, Workspace युजर्स 8 फेब्रुवारीपासून नवीन डिझाइनची चाचणी घेऊ शकतील.2. नवीन लेआउटमध्ये, वापरकर्त्यांना चार ऑप्शन मिळतील, ज्याच्या मदतीने ते मेल, चॅट, स्पेस आणि मीटमध्ये सहजपणे स्विच करू शकतील. सध्या वापरकर्त्यांना Gmail, Chat आणि Meet साठी एकत्रित लेआउट मिळतो.3. नवीन अपडेटनंतर, वापरकर्त्यांना एका वेळी फक्त एक बटण मोठ्या आकारात पाहता येईल. यासोबतच यूजर्सना नवीन इंटरफेसमध्ये नोटिफिकेशन बबल देखील मिळतील, जे त्यांना इतर टॅबबद्दल देखील माहिती देतील. गुगलच्या म्हणण्यानुसार, ज्या वापरकर्त्यांनी नवीन लेआउट अपडेट केले आहे, त्यांना लवकरच नवीन पर्याय दिसू लागतील.4. वर्कस्पेसमधील बदलाची घोषणा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये करण्यात आली होती. यापैकी एका वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्ते Google Meet शिवाय इतर Gmail वापरकर्त्यांना वन-टू-वन कॉल करू शकतात. गुगलने सांगितले की ज्या लोकांना जीमेलचा नवीन लेआउट मिळालेला नाही, ते एप्रिलपासून त्यात शिफ्ट होऊ शकतील.5. Google च्या मते, कायमस्वरूपी बदलापूर्वी जीमेल वापरकर्त्यांना जुन्या मोडमध्ये परत येण्याची संधी मिळेल, परंतु हे वैशिष्ट्य 2022 च्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस पुर्णपणे सुरु केले जाईल. म्हणजेच लवकरच तुम्हाला नवीन Gmail चा अनुभव घेता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.