रत्नागिरी : हिंदू एकतेचे विराट शक्तीप्रदर्शन करत, आज गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आली. मास्कमुक्त आणि कोरोनाचे निर्बंधमुक्त यात्रेमुळे जल्लोष करण्यात आला. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांसह प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवरायांचा जयजयकार करण्यात आला. ढोलपथक, सजीव देखावे, चित्ररथांसह निघालेली ही मिरवणूक चार ते साडेचार तास सुरू होती. ग्रामदैवत श्री भैरी मंदिरातून सुरू झालेल्या या यात्रेची सांगता समाजमंदिर पतितपावन मंदिरात हिंदुत्वाची शपथ घेऊन झाली. पारंपरिक वेषभूषेमध्ये स्वागतयात्रा रंगतदार झाली.
हिंदू एकतेचे विराट शक्तीप्रदर्शन करत, आज गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आली.ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात गाऱ्हाणे होऊन स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. या स्वागतयात्रेचे अठरावे वर्ष होते. कोरोना महामारीमुळे निर्बंध असल्याने दोन वर्ष या यात्रेत खंड पडला. परंतु यंदा शक्ती प्रदर्शन करत ही यात्रा जय्यत झाली. चित्ररथ, ढोल-ताशा पथक, यासह विविध सामाजिक, पौराणिक, पर्यावरण विषयक देखावे यामध्ये साकारले होते.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, लांजा-राजापूरचे आमदार राजन साळवी, माजी आमदार बाळ माने हेसुद्धा या यात्रेत सहभागी झाले. रत्नागिरीकरांनी ख्यालीखुशाली त्यांनी विचारली तसेच नागरिकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. ग्रामदैवत श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदुकेश्वर संस्था, श्री पतितपावन मंदिर संस्था आयोजित या यात्रेतून हिंदू एकतेचे दर्शन घडले. श्री भैरी मंदिरातून सकाळी ९.३० वाजता यात्रा सुरू झाली. खालची आळी, मुरलीधर मंदिर, विठ्ठल मंदिर, गोखले नाका, मारुती आळी, जयस्तंभ, राम आळी, राधाकृष्ण नाका, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिरात या यात्रेची सांगता दुपारी १. ३० च्या दरम्यान झाली. विविध ठिकाणी सरबत, ताक आणि आइस्क्रिमचे वाटप करण्यात आले.
मास्कमुक्त आणि कोरोनाचे निर्बंधमुक्त यात्रेमुळे जल्लोष करण्यात आला.ढोलपथक, सजीव देखावे, चित्ररथांसह निघालेली ही मिरवणूक चार ते साडेचार तास सुरू होती. ग्रामदैवत श्री भैरी मंदिरातून सुरू झालेल्या या यात्रेची सांगता समाजमंदिर पतितपावन मंदिरात हिंदुत्वाची शपथ घेऊन झाली. पारंपरिक वेषभूषेमध्ये स्वागतयात्रा रंगतदार झाली. Esakalसकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.