Hardik Patel Joins BJP esakal
गुजरातमधील चर्चेत असलेला पाटीदार नेता हार्दिक पटेलनं आज भाजपमध्ये प्रवेश केला.
Hardik Patel Joins BJP : गुजरातमधील चर्चेत असलेला पाटीदार नेता हार्दिक पटेल (Hardik Patel) यानं आज (गुरुवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. पटेलच्या आधी काँग्रेसचे नेते श्वेता ब्रह्मभट्ट हे भाजपमध्ये दाखल झाले होते. आता हार्दिक पटेलनं देखील काँग्रेसला हात दाखवला आणि भाजपत दाखल झाले. भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी हार्दिकनं कोबा येथून भाजप कार्यालय कमलम पर्यंत रोड शो केला. हार्दिकच्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, प्रदेश अध्यक्ष सीआर पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी 15 हजारहून अधिक कार्यकर्ते उपस्थित असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला.प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन पटेल यांनी हार्दिकला पक्षाचं सदस्यत्व बहाल केलं. अन्य कोणताही ज्येष्ठ नेता, केंद्रीय पातळीवरील नेता या वेळी उपस्थित नव्हता.हार्दिक पटेलनं गेल्या महिन्यात काँग्रेस पक्ष सोडला होता. त्यांना गुजरात राज्याचे कार्याध्यक्ष बनवण्यात आलं. पण, आपल्याला काम करण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकार नाहीत, असा आरोप हार्दिकनं केला. प्रदेश काँग्रेसच्या कार्यशैलीवर त्यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते.भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेलनं आज दुर्गापूजा केली. शिवाय, ते गायींची पूजा करायलाही गेले. आज हार्दिकनं स्वामीनारायण गुरु मंदिरात पूजाही केली.आज (गुरुवार) सकाळी केलेल्या एका ट्विटमध्ये हार्दिकनं म्हटलंय, 'राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनांसह मी आजपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या कार्यात मी एक लहान सैनिक म्हणूनही काम करेन, असं म्हटलं होतं.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.