Hailstorm In Aurangabad esakal
औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस व गारपीठीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रंगविलेले रब्बीचे स्वप्न क्षणात उद्ध्वस्त झाले आहे. खरिपाची वाट लागल्यानंतर शेतकऱ्यांची मदार रब्बीवर अवलंबुन होती. (Hailstorm And Rain Damages Crops In Aurangabad)
मात्र मंगळवारी (ता.२७) अचानक वातावरणात बदल होऊन पाचोडसह मुरमा, बोडखा, थेरगाव, लिंबगाव, हर्षी, वडजी , दादेगाव, खादगाव, रांजणगाव दांडगा आदी ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार पाऊस व गारपिट होऊन सोंगणीस आलेल्या तर काही ठिकाणी सोंगलेल्या तुरीच्या पिकाची दाणादाण उडाली.ऐन पोटऱ्यात आलेले बहरातील ज्वारी, गहु व हरभऱ्याचे पिक जमिनदोस्त होऊन आडवे झाले.ताणावर घेतलेल्या मोसंबी व डाळींबाच्या बागाचे ताण मोडून बहरलेले आंब्या व मृग बहराच्या फळास गारपिटीमुळे छिद्रे पडून मोठी नुकसान झाली,तर काही ठिकाणी बहरणाऱ्या मोसंबी व आंब्याच्या मोहराची गळ होऊन मोठे नुकसान झाले.पपईच्या बागा चे गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. एकंदरीत शेतातील पिके अर्ध्या तासांत होत्याचे नव्हते होऊन सर्व क्षणात उद्ध्वस्त झाले. लोहगाव (ता.पैठण) महसुल मंडळात अतिवृष्टीनंतर निसर्ग बळीराजाच पिच्छा सोडायला तयार नसुन खरीप हंगामाचे झालेल नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी अडचणीत असतानाही पुन्हा उधार, उसनवारी व खासगी कर्ज काढून रंब्बी हंगामातील पिकासाठी जमीन मेहनत, खते, बियाणे, खरेदी करून पेरणी केली.लोहगाव (जि.औरंगाबाद) शिवारात पाऊस व गाराने कांदा लागवडीच्या वाफ्यात साचलेले पाणी.
कायगाव (जि.औरंगाबाद) : पावसामुळे आडवे झालेले पिक.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.