मुंबई - हम जहा पे खडे होते है लाईन वही सी शुरु होती है......आजही हा संवाद बॉलीवूडमधील ज्या अभिनेत्याला जसाच्या तसा लागू होतो त्या अभिनेत्याचे नाव अमिताभ बच्चन. ते बॉलीवूडचे शहेनशहा आहे. अनभिषिक्त सम्राटही आहे. ते म्हणजे बॉलीवूड असे समीकरण अनेकदा पाहायला मिळाले आहे. करिअरच्या सुरुवातीला सात ते आठ चित्रपटांचे अपयश पाहिल्यानंतर देखील त्यांनी हार न मानता नेटानं आपली भूमिका सुरु ठेवली. अखेर त्यांना यश मिळालं. आणि त्यांनी बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा शिक्का उमटवला. आज अमिताभ यांच्या नावाचा ब्रँण्ड तयार झाला आहे. अशा या महान अभिनेत्याचा आज जन्मदिन आहे. त्यानिमित्तानं त्यांच्याविषयक वेगवेगळ्या आठवणींना दिलेला हा उजाळा.
अमिताभ यांनी 1969 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांनी मृणाल सेन यांच्या भुवन शोम या चित्रपटाला आवाज दिला होता. व्हाईस ओव्हरच्या माध्यमातून ते बॉलीवूडमध्ये आले. सत्यजित रे यांच्या शतरंज के खिलाडीला देखील त्यांचा आवाज होता. बिग बी यांनी 1969 मध्ये ख्वाजा अहमद यांच्या सात हिंदूस्थानी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं. हा चित्रपट फ्लॉप झाला होता. अमिताभ यांनी अभिनेता होण्यापूर्वी ऑल इंडिया रेडिओ निवेदकासाठी मुलाखत दिली होती. दिल्लीत दिलेला तो इंटरव्ह्यु आजही बिग बींच्या लक्षात आहे. त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून त्याविषयी सांगितलं आहे. मात्र त्या मुलाखतीतून त्यांना बाहेर काढण्यात आले होते. अमिताभ बच्चन जया यांना परदेशी सुट्टीसाठी नेण्याच्या विचारात होते. त्यासाठी त्यांना वडिलांची परवानगी हवी होती.
वडील हरिवंशराय बच्चन म्हणाले होते की, जर तुम्हाला जया सोबत सुट्टी घालवायची असेल, तर पहिल्यांदा तिच्याशी लग्न करावे लागेल. त्यानंतर ३ जून १९७३ रोजी अमिताभ आणि जया यांनी अतिशय साध्या पद्धतीने लग्न केले.अमिताभ बच्चन हिट चित्रपटासाठी स्ट्रगल करत होते. १२ फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अमिताभ यांनी बॉलिवूड सोडण्याचा विचार केला होता. त्यावेळी त्यांना जंजीरची ऑफर मिळाली, आणि मुख्य अभिनेत्री म्हणून जया बच्चन यांनाही घेण्यात आलं होतं.
प्रख्यात अभिनेते सुनील दत्त यांनी त्यांना आपल्या रेश्मा और शेरामध्ये एका मुक्या व्यक्तीची भूमिका देऊ केली होती. त्याची शिफारस पंतप्रधान इंदिरा गांधीच्या पत्रानं केली होती. आणि ते पत्र सुनीलजी यांची पत्नी नर्गीस यांच्यामुळे मिळाले होते. संघर्षाच्या काळात अमिताभ यांना कलाकार मेहमूद यांनी मोठी मदद केली होती. त्यांना आपल्या घरात राहण्याची परवानगी दिली होती. अमिताभ यांनी या गोष्टीचा कधीही विसर पडू दिलेला नाही. अमिताभ यांना प्रत्येक गोष्टीत नकार मिळत होता. पहिल्या नोकरीत नकार, पहिल्या चित्रपटात जेव्हा अभिनेत्याच्या रोलसाठी स्क्रिन टेस्टला गेले तेव्हाही नकार. त्याचं कारण त्यांची उंची जास्त होती. मात्र अमिताभ हे काही निराश झाले नाहीत. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.