harmanpreet kaur news sakal
Women's Big Bash League : भारताची स्टार अष्टपैलू हरमनप्रीत कौरला एक अतिशय खास पुरस्कार मिळाला आहे. हरमनप्रीतला महिला बिग बॅश लीगमध्ये 2021 मधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. हा मान मिळवणारी हरमन हि भारताची पहिली खेळाडू आहे.
भारतीय T20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला महिला बिग बॅश लीग (WBBL) 2021 साठी विशेष पुरस्कार मिळाला आहे.हरमनप्रीत कौरची महिला बिग बॅश लीग 2021 ची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली आहे. हरमनप्रीतने गेल्या मोसमात बॅट आणि बॉलने आश्चर्यकारक कामगिरी केली होती आणि तिला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
बीबीएलमध्ये भारतीय खेळाडूला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्याची ही पहिलीच वेळ आहे.मेलबर्न रेनेगेड्स कडून खेळताना हरमनप्रीतने बीबीएल 2021 मध्ये 399 धावा केल्या आहेत आणि १५ विकेट्सही घेतल्या आहेत.हरमनप्रीत कौरने बीबीएलनंतर महिला विश्वचषक 2022 मध्ये धुमाकूळ घातला. त्याने या स्पर्धेत 20 षटकार मारले होते.महिला विश्वचषक 2022 मध्ये स्मृती मंधानानंतर भारतासाठी हरमनप्रीत कौरने सर्वाधिक धावा केल्या होत्या.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.