Hartalika Teej 2021 esakal
देशात सणासुदीच्या हंगामाला सुरू झाली असून यंदा 'हरतालिका तीज'च्या सणासाठी सर्वत्र तयारी केली जात आहे. हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यात महत्वाचं व्रत म्हणजे हरतालिका! भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिका व्रत केलं जातं. असं मानलं जातं, की स्त्रिया अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हा उपवास करतात. हा उपवास सर्व उपवासामध्ये सर्वात कठीण, परंतु श्रेष्ठ मानला गेला आहे. या दिवशी कडक उपोषण करुन पाणीही पिऊ नये, अशी रुढी आहे. या दिवशी मुली व सुवासिनी शिवलिंगे स्थापित करुन भक्तिपूर्वक पूजा करतात. अविवाहित मुली योग्य वर मिळवण्यासाठी हरतालिका व्रत ठेवतात. कोणाबद्दलही मनात द्वेष बाळगू नका : धर्म तज्ज्ञांचा असा विश्वास आहे, की कोणताही उपवास तेव्हाच पूर्ण मानला जाऊ शकतो, जेव्हा तुम्ही तो 'उपवास' स्वच्छ मनानं आणि भक्तीनं पूर्ण केलेला असेल. मनात एखाद्याबद्दल द्वेष किंवा तिरस्काराची भावना असेल, तर हा उपवास मोडला जाऊ शकतो. त्यामुळे कुणाबद्दलही आपल्या मनात चुकीची भावना येता कामा नये. मन शुद्ध आणि सात्विक ठेवून उपवासाच्या दिवशी देवाला प्रार्थना करावी.कोणाचाही अनादर करू नका : उपवासाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीचा अनादर होऊ नये, याची आपण काळजी घ्यायला हवी. देव प्रत्येकाच्या हृदयात वास्तव करत असतो. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीचा तुम्ही अनादर केला, तर हा अनादर तुम्ही परमेश्वराचाच केला असा होता. त्यामुळे आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची देखील आपण पुरेपूर काळजी घ्यायला हवी. घरातील ज्येष्ठांची सेवा करा, त्यांना आनंदी ठेवा यातच परमेश्वराचं सुख सामावलं आहे. एखाद्याला दुखवून उपवासाचे फळ कधीच आपल्याला मिळणार नाही.आपल्या मनावर नियंत्रण ठेवा : उपवासाचा एक अर्थ म्हणजे, आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून स्वतःला ईश्वराच्या चरणी स्वाधिन करणं, त्याला शरण जाणं. ज्या स्त्रिया हरतालिका तीजचे व्रत पाळतात, त्यांनी आपल्या रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवायला हवे. प्रत्येकांशी भेटून त्यांच्याशी प्रेमानं बोलावं. या काळात दिवसाचा जास्तीत-जास्त वेळ देवाच्या उपासनेत घालवावा. असं केल्यानं तुम्हाला उपवासाचे पूर्ण फायदे मिळू शकतात.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.