पालक ही अशी एक भाजी आहे जी पोषक तत्वांनी भरपूर आहे. अनेक पदार्थ एकत्र करून आपण पालकाचे सेवन करतो. पालक पनीर खाणे लोकांना प्रचंड आवडते.
पालकमध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतात आणि शरीराला यातून ताकद मिळते. हिवाळ्याच्या मोसमात लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. पालक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतो. आरोग्य तज्ज्ञ हिवाळ्यात अधिकाधिक पालक खाण्याचा सल्ला देतात. पालक पनीरचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. पालक पनीर खूप चविष्ट आहे. पालक पनीर बहुतेकदा उत्तर भारतीयांच्या ताटात दिसतो. पालक पनीर केवळ चवीनुसारच नाही तर पौष्टिक घटकांनी परिपूर्ण पदार्थ आहे.पालकासोबत पनीर खाऊ नये कारण काही अन्नपदार्थ एकटेच खाणे फायदेशीर असते, परंतु जेव्हा ते दुसर्या पदार्थात मिसळले जाते तेव्हा दुसऱ्या अन्नाचा फायदा होणार नाही.
पालकामध्ये उपस्थित असलेले लोह मिळविण्यासाठी पालकामध्ये बटाटे किंवा कॉर्न घालावे, पनीर घालू नये.पालकासोबत तीळ खाल्ल्यास तुमची पचनक्रिया बिघडू शकते. पालकामध्ये तीळ घातल्याने जेवणाची चव तर वाढतेच, पण त्याचे सेवन केल्याने अतिसाराचा धोका वाढू शकतो.हवामान बदलल्यावर सर्दी आणि कफ दूर करण्यासाठी अनेकदा लोक दुधासोबत पालकाचे सेवन करतात. हे पदार्थ टाळणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.