शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक व्यायाम करतात. मात्र उन्हाळ्यामध्ये व्यायाम करताना काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यामध्ये व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, हे आज आपण पाहणार आहोत. (Take care of these things while exercising in summer
1. पहाटेच व्यायाम: उन्हाळ्यात उष्णता लवकर वाढते, त्यामुळे पहाटेच किंवा भल्या सकाळीच व्यायामाला प्राधान्य द्यावे. जास्त घाम येईल, असा व्यायाम टाळावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर थकवा किंवा उष्माघाताचा धोका संभवतो. 2. पाण्याबरोबर खनिजे: शरीरातील पाण्याची पातळी टिकविण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे. त्याचबरोबर घामामुळे कमी होणाऱ्या शरीरातील खनिजांचीही भरपाई व्हायला हवी. म्हणून पोटॅशियम, सोडीयम, क्लोराईड आदी खनिजयुक्त पाणी पिण्यास प्राधान्य द्यावे.
3.सैल कपडे घाला: हलक्या रंगाचे कपडे उष्णतेला परावर्तित करतात. त्यामुळे हलक्या रंगाचे आणि घाम येऊ नये म्हणून सैल कपडे वापरावीत4.त्रास झाल्यास थांबा: तुम्हाला चक्कर येणे, अशक्त होणे किंवा मळमळणे सुरू होईल इतके व्यायाम करू नका. जलद हृदयाचे ठोके, हलके डोके, अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, स्नायू पेटके, उलट्या याकडे दुर्लक्ष करू नये. असे झाल्यास बसा, पाणी प्या आणि काही पौष्टिक फळे किंवा नाश्ता घ्या.
5. या व्यायामांना द्या प्राधान्य : पोहणे, दोरीच्या साहाय्याचे व्यायाम धृतगतीयोग (हलका वार्मअप), सावलीत करण्यायोग्य व्यायाम प्रकार
6. शरीराला थंडावा देणारी योगासने आणि प्राणायामांना प्राधान्य द्यावे. यात प्रामुख्याने शितली प्राणायाम आणि शित्कारी प्राणायामांचा समावेश होते. तसेच जमिनीवर झोपून करता येणारे सर्व प्राणायाम उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत करतात, असं योग प्रशिक्षक निलेश आंबरे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.