Amarnath Yatra 2022 Postponed esakal
अमरनाथ यात्रेदरम्यान मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळं यात्रेकरूंची निराशा झालीय.
नवी दिल्ली : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेदरम्यान (Amarnath Yatra) मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळं यात्रेकरूंची निराशा झालीय. रामबनमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळं महामार्गावरील वाहनांची वाहतूक बंद करण्यात आलीय. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळं पवित्र गुहा अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंचा जत्था थांबवण्यात आलाय. धोका लक्षात घेता प्रवाशांना आता बेस कॅम्पवर परतण्यास सांगण्यात आलंय.जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळं (Heavy Rain in Jammu and Kashmir) चिनाब नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीय. अशा परिस्थितीत डीसी जम्मूनं अलर्ट जारी केलाय. लोकांना किनारी भागापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील कुलन गुंड भागात पावसाची नोंद झालीय. दरम्यान, श्रीनगर-लेह महामार्गावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली असून श्रीनगर-लेह महामार्ग बंद करावा लागलाय. मात्र, कुलन लिंक रोडवरून वाहतूक वळवण्यात आलीय.जम्मू-काश्मीरमधील रामबनजवळील पंथ्याल परिसरात भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळं अमरनाथ यात्रा बराच काळ ठप्प झाली होती. या भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलनाचा धोका असल्यानं अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आलीय.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी अमरनाथ यात्रेदरम्यान एकूण 36 यात्रेकरूंचा मृत्यू झालाय. 11 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पवित्र गुहेची यात्रा संपणार आहे. दरम्यान, पावसामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.