konkan rain update latest
राजापूर : रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपून काढल आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून राजापूरच्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नद्यांना पूर येऊन पुराच्या पाण्याने राजापूर शहराला वेढा दिला आहे. दरम्यान, आज सकाळपासून पाणीपातळी उतरण्यास सुरुवात झाली आहे. सात तासानंतर पूर ओसरला असल्याची माहिती मिळत आहेत. मात्र कोकणता पावसाची संततधार सुरु असल्याने या भागातील नारगरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. (konkan rain update latest)
रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपून काढल आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून राजापूरच्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नद्यांना पूर येऊन पुराच्या पाण्याने राजापूर शहराला वेढा दिला आहे. दरम्यान, आज सकाळपासून पाणीपातळी उतरण्यास सुरुवात झाली आहे. सात तासानंतर पूर ओसरला असल्याची माहिती मिळत आहेत. मात्र कोकणता पावसाची संततधार सुरु असल्याने या भागातील नारगरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पुराच्या पाण्याने जवाहर चौकामध्ये धडक देण्याची यावर्षीची पहिली घटना आहे. तासागणिक पुराचे पाणी वाढत चालले आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग धस्तावला.शीळ, गोठणे, दोनीवडे, चिखलगाव, रस्ता पाण्याखाली गेला आहे. नदीच्या काठावरील शीळ, उन्हाळे, गोठणे दोनीवडे, चिखलगाव, आगले आदी गावातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. काल रात्री उशिरा पुराचे पाणी ओसरले आहे. दरम्यान जवाहर चौक परिसर मोकळा झाला असून व्यापारी सतर्क असल्याने कोणाचेही फारसे नुकसान झालेले नाही.शीळ-गोठणे दोनीवडे रस्ता पाण्याखाली आहे. जवळेथर, मूरसह पाचल परिसरामध्ये तहसीलदार शीतल जाधव यांनी तातडीने भेटी देऊन पाहणी केली. प्रशासनासह लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रातधिकारी वैशाली माने, शीतल जाधव यांनी दिल्या आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.