चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमध्ये मुसळधार पावसाने अनेक वर्षांचा विक्रम मोडला आहे.
चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमध्ये मुसळधार पावसाने अनेक वर्षांचा विक्रम मोडला आहे. सतत पडणारा हा पाऊस आता लोकांसाठी आपत्ती ठरत असून या पावसामुळे चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलेय. पावसाने रौद्र रुप धारण केल्याने मदत कार्यासाठी बोटींना रस्त्यावर उतरावे लागले आहे.चीनमध्ये सततच्या पावसामुळे बीजिंगमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून लोक मोठ्या वाहनांना धक्का देऊन पाण्या बाहेर काढत आहेत.हा मुसळधार पाऊस पाहता हवामान विभागाने बीजिंगमध्ये 'यलो अलर्ट' जारी केला आहे. बीजिंगमध्ये यावर्षीच्या पावसाने 62 वर्षांचा विक्रमही मोडीत काढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसामध्ये 30 टक्क्यांनी वाढ झालीय.बीजिंगमध्ये आत्तापर्यंत 627.4 मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्या 20 वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस आहे. चीन सरकारने मदत आणि बचाव कार्यासाठी अनेक खबरदारीची पावले उचलायला सुरुवात झालीय. हा पाऊस ओसरला नाही तर, चीनवर मोठी आपत्ती येण्याची शक्यता आहे.चिनी वृत्तसंस्था सिन्हुआच्या अहवालानुसार, हवामान विभागाने सांगितले आहे, की चीनच्या काही भागात मुसळधार पावसासह 60 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्याही त्यांनी सूचना दिल्या आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.