दैनंदिन जीवनात आपली आहार पध्दती जर योग्य नाही ठेवली तर अनेक आजारांना निमंत्रण द्यावे लागते. त्यातच जर शरीरात लोहाची पातळी योग्य असेल तरच शरीर निरोगी राहते. अन्यथा अनेक आजारांना निमंत्रण द्यावे लागते. यासाठी नियमित चांगली झोप, व्यायाम आणि योग्य आहार ही त्रिसुत्री असणे गरजेची असते. शरीरात हिमोग्लोबिन (Hemoglobin)तयार करण्यासाठी लोह सर्वात महत्वाचे आहे.
हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तातील पेशींमध्ये असलेले लोहयुक्त प्रथिन आहे, जे शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजनचा (Oxygen)पुरवढा करते. यासाठी नियमित खाण्यात लोहयुक्त पदार्थाचा समावेश करावा. नियमित आहारात मांसाहार, सीफूड, हिरव्या पालेभाज्या, ड्रायफ्रुट्स (Dry Fruits)आणि नट्सचा समावेश करा. आज तुम्हाला हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करणारे पाच पदार्थ सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला तर जाणून घेऊया.
. काजू (Cashew Nuts)
काजूमध्ये भरपूर लोह असते. मूठभर काजूमध्ये 1.89 मिलीग्रामपर्यंत लोह असते. जेव्हाही तुम्हाला भूक लागते तेव्हा जंक फूडऐवजी मूठभर काजू खाऊ शकता. यामुळे तुमची भूक तर शमवेलआणि शरीराला महत्त्वाचे पोषक तत्वही मिळतील. जर तुम्हाला लोहाची कमतरता जाणवत असेल, तर तुम्ही नियमित आहारात काजूचा समावेश करू शकता. पिस्ता (Pista)
बऱ्याच कुटुंबात नाश्तात पिस्ता वापरतात. त्याचबरोबर पिस्त्याचा वापर मिठाईमध्येही भरपूर केला जातो. अनेकजण फक्त पिस्ता खाण्याचे शौकिन असतात. पिस्त्यामुळे लोहाची कमतरता भरून निघते. मूठभर पिस्त्यात 1.11 मिलीग्रामपर्यंत लोह असते. त्यामुळे रक्त वाढीसाठी तुम्ही नियमित पिस्ता खाऊ शकता. अक्रोड (Walnut)
बौध्दिक क्षमता वाढवण्यासाठी अक्रोडाचा उपयोग होतो. याशिवाय हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्याचे काम अक्रोड करते. अक्रोड हे पोष्ठिक नट्स (Dry Fruits)आहे. मूठभर अक्रोडातून सुमारे 0.82 मिलीग्राम लोह मिळेल.
भुईमूग (Peanuts)
शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि अनेक पोषक तत्व असतात. हिवाळ्यातला ड्राय फ्रूट म्हणून शेंगदाणे खाऊ शकता. शिवाय जर तुम्हाला जास्त ड्रायफ्रूट्स खायला आवडत नसेल, तर तुम्ही तुमच्या जेवणात शेंगदाणे समाविष्ट करू शकता. मूठभर शेंगदाण्यांमध्ये 1.3 मिलीग्राम लोह असते. तुम्ही तुमच्या आहारात शेंगदाण्यांचा समावेश केला पाहिजे. बदाम (Almonds)
बदामाला सर्व ड्रायफ्रुट्सचा राजा मानला जातो. बदामामध्ये पोषक तत्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. भिजवलेले बदाम रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. जर तुम्ही मूठभर बदाम खाल्ले तर तुम्हाला 1.05 मिलीग्रामपर्यंत लोह मिळते. अनेकांना बदामाचे दूध आणि बदाम बटर खायलाही आवडते. तुम्ही तुमच्या आहारात बदामाचा समावेश केला पाहिजे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.