Heritage Places in Pune Sakal
Heritage Places in Pune: वर्ल्ड हेरिटेज दिन अर्थात जागतिक वारसा दिन (World Heritage Day) हा आपल्या वैभवशाली सांस्कृतिक विविधतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि आपला पुरातन वारसा जपण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी साजरा केला जातो. युवा पिढीला त्यांचे सांस्कृतिक वैभव जपण्याचा आणि तो वारसा पुढील पिढीकडे नेत राहण्याबद्दल महत्त्वाचा संदेश देणे हा दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर `रॉयल एनफिल्ड` या दुचाकी कंपनीने पुणेकरांना शहरातील ऐतिहासिक स्थळांना `क्लासिक ३५०` द्वारे भेट देण्याचे आवाहन केले आहे.
दख्खनची राणी अशी ओळख मिळालेले पुणे शहर दख्खनच्या पठारावर स्थित आहे. पेशव्यांची जुनी राजधानी असलेले पुणे शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र देखील आहे. पुण्यातील पुरातन स्थळे ही मराठा राज्यकर्त्यांची आणि तेथे वास्तव्यास असलेल्या पौराणिक भारतीयांना वाहिलेली आदरांजली आहेत. या स्थळांवर आढळणारे अप्रतिम बारकावे आणि यांचा इतका विस्तृत परिसर तो काळ आपल्यासमोर पुन्हा नव्याने उभा करतो. `रॉयल एनफील्ड` कणखरपणा, दीर्घकालीन टिकाऊपणा १९०१ पासून सांभाळत आहे. कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून मोटरसायकल चालवण्यातील धमाल अनुभव देणे कायम ठेवले आहे. त्यामुळे जागतिक वारसा दिनानिमित्त नवीन क्लासिक ३५०वर स्वार होऊन नयनरम्य पाच स्थळांची आरामदायी राईड करावी, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.
१) आगा खान पॅलेस : १८९२ मध्ये सुलतान आगा खान-३ याने बांधलेला महाल हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांसारख्या प्रसिद्ध नेत्यांना कैदी म्हणून ठेवले होते. १९ एकरातील मोठ्या परिसरामध्ये अप्रतिम वास्तुशिल्पकलेचा नमुना अगा खान पॅलेसमध्ये पाहता येणार आहे.
२) शनिवार वाडा : शनिवार वाडा हा २८६ वर्षे जुना महाल आहे, जो शहरातील सुंदर वास्तुशिल्पकलेचा नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. हा वाडा पहिले बाजीराव पेशवे यांनी पेशव्यांच्या वास्तव्यासाठी बांधला होता. प्रवेशद्वारावर पहिले बाजीराव पेशवे यांचा छानसा पुतळा आहे. सोबत अप्रतिम बागा आणि कारंजी आहेत, जी येथे भेट देणाऱ्यांना खूश करून टाकतात. ६२५ एकरात हा वाडा उभारण्यात आला आहे.
३) सिंहगड किल्ला : सिंहगड किल्ला कधीकाळी `कोंढाणा` म्हणून ओळखला जात असे. त्याने १६७०चे सिंहगडाचे युद्ध तसेच इतर अनेक लढाया पाहिलेल्या आहेत. `सिंहगड` या शब्दाचा अर्थच सिंहाचा गड म्हणजे सामर्थ्य, शक्ती आणि अप्रतिम क्षमता यांसारख्या गुणांची साक्ष देणारा आहे. पुणे शहराच्या नैऋत्येला ४९ किलोमीटरवर असलेले हे ठिकाण अंतर्ज्ञानाने प्रतिसाद देणारे आणि गुंतवून ठेवणारे आहे. किल्ल्याच्या सभोवताली सह्याद्री पर्वतरांगा असून हे ठिकाण नवीन साहसी कृत्यांसाठी प्रसिद्ध आहे.
४) पाताळेश्वर मंदीर : पाताळेश्वर मंदिर किंवा भांबुर्डे पांडवकालीन गुंफा मंदिर हे पुण्यातील सर्वात जुने स्थळ आहे, जे आठव्या शतकामध्ये बांधले आहे. तोडफोडीमुळे गुंफेच्या आतील भागाचे नुकसान झाले आहे. आता या ठिकाणी नवीन मूर्ती आहेत आणि या स्थळाच्या सभोवताली नैसर्गिक बाग आहे. अप्रतिम वास्तुशास्त्राचा नमुना असलेले आणि वैविध्यपूर्णता व आधुनिकतेची नेमकी सांगड घालणारे पाताळेश्वर मंदिर हे भटकंतीसाठी योग्य ठिकाण आहे.
हेरिटेज वॉक : रॉयल एनफिल्डच्या क्लासिक ३५० वरून विविध स्थळांना भेट दिल्याने शहरातील अत्यंत पुरातन गल्लीबोळांची, चौक आणि नाक्यांची ओळख होणार आहे. पुरातन, मध्ययुगीन किंवा ब्रिटीश साम्राज्यातील भटकंती यांपैकी काहीतरी निवडून या ठिकाणाला भेट देण्यासाठी केलेला तीन तासांचा प्रवास हा इतिहासाबद्दल बरीचशी माहिती देणारा ठरेल, असा विश्वास रॉयल एनफिल्ड कंपनीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.