कर्नाटक: हिजाब वादाचे पडसाद सगळीकडे उमटले जात असतानाच आज बेळगावात मात्र दहावीच्या परीक्षेवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळपासून परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र पहिल्या दिवशी ४३० विद्यार्थीनी परिक्षेला दांडी मारली.परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी सीसीटीव्हीची सक्ती करण्यात आली होती. तसेच फिरते पथक देखील परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवून होते. 11 एप्रिल रोजी परीक्षेची सांगता होणार आहे.
शिक्षण खात्याने दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश परिधान करण्याची सूचना केली होती. तसेच हिजाब घालून आल्यास परीक्षा केंद्रांवर नो एंट्री केली जाणार होती. त्यामुळे काही परीक्षा केंद्रांवर गोंधळ होण्याची शक्यता गृहीत धरून अधिक प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पेपरला सकाळी 10 : 30 वाजता सुरूवात झाली. मात्र विद्यार्थी 9 वाजल्यापासुनच परीक्षा केंद्रांवर दाखल झाले होते. तसेच सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना परीक्षा केंद्रांवर सोडले जात होते. पहिल्या दिवशी मराठी, कन्नड, उर्दू व इंग्रजी (प्रथम भाषा) विषयाचे पेपर पार पडले. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर 33274 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 430 विद्यार्थी गैर हजर होते. परंतु जिल्ह्यात पहिल्या पेपरला कोणताही विद्यार्थी डिबार झालेला नाही.परीक्षा केंद्रांवर ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना परिवहन खात्यातर्फे मोफत बससेवेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्याचाही विद्यार्थ्यांना चांगला लाभ झाला असून अनेक परीक्षा केंद्रांबाहेर पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र विद्यार्थ्यांना सोडल्यानंतर पालकांना थांबण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात येत होती. तसेच परीक्षा केंद्रांवर 144 कलम अंतर्गत जमावबंदीचा आदेश देण्यात आल्याने परीक्षा केंद्राबाहेर शुकशुकाट पाहावयास मिळत होता. परीक्षेला सुरळीत सुरुवात झाली आहे. पहिल्या पेपर प्रमाणेच इतर विषयांच्या पेपरला देखील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे शिक्षणाधिकारी
बसवराज नलतवाड यांनी सांगितले.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.