रंगांचा सण असलेली रंगपंचमी 18 मार्च रोजी देशभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी करतात. रंगपंचमी संस्मरणीय व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते.
रंगपंचमीची आधीच तयारी पूर्ण केली की हा सण संस्मरणीय ठरतो. रंगपंचमीचा सण संस्मरणीय करायचा असेल तर काही काम आधीच करावे लागते.
अनेकदा रंगपंचमीच्या दिवशी लोक रंग खरेदी करायला जातात, परंतु तसे करू नका. रंगपंचमीच्या दिवशी भेसळयुक्त रंग बाजारात अधिक आढळतात. रंगपंचमीच्या काही दिवस आधी तुम्ही रंग विकत घ्या.रंगपंचमीला प्रत्येक घरात गोड पदार्थ बनवला जातो. याशिवाय घराघरांत मिठाई, अल्पोपहार आणला जातो. या सर्व वस्तू आधीच खरेदी करा. रंगपंचमीच्या दिवशी मिठाई खरेदी करणं टाळा.
रंगपंचमीच्या दिवशी मित्र-मैत्रिणींसोबत काही प्लॅन असेल तर तो आधीच ठरवा. मित्र-मैत्रिणींसोबत रंगपंचमी कशी साजरी करता येईल याचे आधीच प्लॅनिंग करा.रंगपंचमीच्या दिवसासाठी प्रथमोपचार किट (Firsted Kit) तयार करा आणि त्यात सर्व औषधे ठेवा. रंगपंचमीच्या दिवशी मेडिकलची दुकानं बंद असतात, त्यामुळे घरात औषध ठेवायला हवं.रंगपंचमीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणते कपडे घालायचे हे आधीच ठरवा. रंगपंचमीच्या दिवशी भरपूर काम असल्यामुळे कोणते कपडे घालायचे ते पटकन ठरवता येत नाहीत.
रंगपंचमीच्या दिवशी कोणता पदार्थ बनवायचा.ते आधीच प्लॅन करुन ठेवा. अशावेळी रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळून आरामात स्वयंपाक करता येतो.
या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमची रंगपंचमी संस्मरणीय बनवू शकता. रंगपंचमीदिवशी भरपूर रंग खेळा.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.