Home Remedies on Malaria Sakal
World Malaria Day 2022: जागतिक मलेरिया दिन दरवर्षी 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो. मलेरिया हा आजार डासांमुळे पसरणाऱ्या आजारांपैकी एक आहे. भारतात मलेरियाचे रुग्ण आणि मलेरियामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच दरवर्षी या दिवशी लोकांमध्ये या आजाराबाबत जागरुक केले जाते. मलेरियाचा सामना करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. (Home Remedies on Malaria)
1) हळद- हळदीचा वापर भारतीय घरांमध्ये दररोज केला जातो. यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. प्लास्मोडियम संसर्गामुळे शरीरात तयार होणारी विषारी द्रव्ये हळद बाहेर काढण्यास मदत करते. हळद मलेरियाचे पॅरासाइट नष्ट करण्यास मदत करते. हळदीतील एंटी इंफ्लेमेटरी गुणधर्म स्नायू आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात, जे मलेरियामध्ये सामान्य आहेत. मलेरियाचा सामना करण्यासाठी, दररोज रात्री एक ग्लास हळदीचे दूध प्या.
२) आले-आल्यामध्ये एंटी इंफ्लामेटरी आणि एंटी माइक्रोबियल गुणधर्म असतात. आले वेदना कमी करण्यास मदत करू शकते. यासोबतच आले मळमळण्याच्या समस्येवरही मदत करू शकते. यासाठी गरम पाण्यात आले टाकून त्यात मध मिसळून दिवसातून दोनदा प्या.
३) संत्र्याचा रस- जर तुम्हाला मलेरियाची लागण झाली असेल तर तुम्ही तुमच्या आहारात संत्र्याचा रस समाविष्ट करू शकता. संत्र्याच्या रसामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. संत्र्याचा रस ताप कमी करण्यास देखील मदत करू शकतो. जर तुम्हाला मलेरियाची लागण झाली असेल तर तुम्ही 2 ते 3 ग्लास ताज्या संत्र्याचा रस घेऊ शकता.
४) दालचिनी- दालचिनीमधील दाहक-विरोधी, अँटीऑक्सिडंट आणि प्रतिजैविक गुणधर्म मलेरियाच्या लक्षणांशी लढण्यास मदत करतात. गरम पाण्यात दालचिनी आणि काळी मिरी पावडर टाकून दिवसातून एक किंवा दोनदा प्या.५) मोहरीचे तेल- मोहरीच्या तेलात अन्न शिजवल्याने मलेरियाची लागण झालेल्या व्यक्तीला मदत होऊ शकते. मोहरीचे तेल संसर्गाशी लढण्यास मदत करते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.