पीरियड्सदरम्यान होणाऱ्या वेदनांवर घरगुती उपाय (Home Remedies on Menstruation Pain):
मासिक पाळीदरम्यान (Period) पोटात दुखणे सामान्य आहे. कधीकधी ही वेदना संपूर्ण शरीरात आणि अगदी पायापर्यंत जाणवते. काही स्त्रियांना पीरियड क्रॅम्प (Period Cramp) होतात, तर काहींना होत नाहीत. याचे नेमकं कारण काय आहे हे अजूनही अनुत्तरीत आहे. काही महिलांना वेदनांसोबत उलट्या (Vomiting) आणि चक्कर (Dizziness) येण्याची समस्या असते. बहुतेक प्रकरणांमध्ये, काहीही गंभीर होत नाही. तथापि, कधीकधी ही मासिक पाळीची वेदना (Period Pain) इतकी असह्य असते की, आपल्या दिनचर्येवर परिणाम होतो. समस्या खूप जास्त असल्यास डॉक्टरांना भेटून आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधं घेणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. परंतु त्रास कमी असेल आणि तुम्हाला औषध घ्यायचे नसेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
1. गरम पाण्याची बाटली किंवा हीटिंग पॅड देखील मासिक पाळीच्या (Menstruation) वेदनांमध्ये खूप आराम देते. जर तुम्ही पेन किलर देखील घेत असाल तर याला एकत्रितपणे लागू केल्यास चांगले परिणाम मिळतील.2. मासिक पाळी दरम्यान अधिकाधिक पाणी पिण्याचा (Drink Water) सल्ला दिला जातो. हिवाळा असो किंवा उन्हाळा, जेव्हा तुम्हाला हलक्या वेदना जाणवू लागतात, तेव्हा पाण्याची बाटली सोबत ठेवा आणि थोड्या थोड्या वेळाने पाणी प्या.3. काही संशोधनांनी असे सुचवले आहे की, आहारात मॅग्नेशियमचे प्रमाण वाढवल्याने मासिक पाळीच्या क्रॅम्पमध्ये आराम मिळतो. पालक, बदाम, दही आणि पीनट बटर हे मॅग्नेशियमयुक्त पदार्थ आहेत.4. मुली मासिक पाळीच्या काळात व्यायाम करणे बंद करतात. परंतु वर्कआऊटमुळे (Workout) तणाव दूर होण्यासोबतच पीरियड्सशी (Perids) संबंधित अनेक समस्या दूर होतात. मासिक पाळीच्या दरम्यान थकवा किंवा मूड स्विंगची तक्रार असल्यास एरोबिक व्यायामामुळे आराम मिळू शकतो. याचे कारण असे की व्यायामामुळे तुमची एंडोर्फिनची पातळी वाढते. ज्यामुळं तुमचा मूड चांगला होतो. त्याचवेळी मासिक पाळीच्या आधी आणि दरम्यान सक्रिय राहिल्याने पीरियड क्रॅम्पमध्ये आराम मिळतो. जर तुम्हाला जास्त व्यायाम करायचा नसेल तर हलका व्यायाम करा; उदा: चालणं किंवा पाठीवर झोपून सायकलिंग करणे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.