Holi Celebration Tips: होळीमध्ये मौजमस्तीसोबतच लोक भांग पिऊन धमाल करत असतात. मिठाई, रंगांची उधळण यासोबतच लोक भांग पितात. बऱ्याचदा अतिउत्साहात लोक जास्त भांग पितात आणि मग त्याचा परिणाम पुढच्या दिवसावर होतो. म्हणूनच भांगाच्या हँगओव्हरमधून बाहेर येणं महत्त्वाचे आहे. त्यासाठीचे घरगुती उपाय जाणून घेऊया.(home remedies to Get rid of hangover of Bhang in Holi)
लिंबू पाणी हँगओव्हर उतरण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग आहे. एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून रात्री झोपण्याआधी प्या.लिंबू पाणी प्यायल्यामुळे तुमचा हँगओव्हर उतरेलच शिवाय डोकेदुखीही कमी होईल. तुम्ही लिंबाशिवाय कोणतंही फळ जसं की, मोसंबी, संत्रे असे आंबट फळ खाऊ शकता. दही फक्त भांगच नाही, तर दारूचा हँगओव्हर उतरवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु हे खाताना त्यात साखर टाकू नये.
दारु प्यायल्यामुळे शरीरात हानिकारक बॅक्टेरीया तयार होतात, त्यांचा शरीरावर वाईट परिणाम होतो. दही त्या सर्व खराब बॅक्टेरियांच्याजागी चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करण्यास मदत करते.
केळीसुद्धा हँगओव्हर उतरवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. केळ्यात पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीरात प्रोबायोटिक्स गुणांचा पुरवठा करतात. नारळ पाणीसुद्धा हँगओव्हर उतरण्यासाठी उत्तम मार्ग आहे. जास्त दारु पिण्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. नारळपाण्यामुळे ती कमी भरून निघते.
नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाईट्स असतात, जे शरीराला हायड्रेट करतात आणि आवश्यक पोषणतत्त्वे पुरवते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.