प्रेम जर दोन्ही बाजूंनी असेल तर प्रेमासारखी सुंदर भावना नाही; पण प्रेम एकतर्फी असेल तर त्याच्यासारखं वेदनादायीसुद्धा काहीच नाही. पुढच्या व्यक्तीप्रती कितीही निष्ठा, प्रेम, आदर बाळगला तरी एकतर्फी प्रेम करणाऱ्याच्या पदरी निराशाच पडते. अशा व्यक्ती जगाच्या दृष्टीने मनोरंजनाचं साधन ठरतात आणि लोक त्यांची खिल्ली उडवतं. आधीचं एकतर्फी प्रेमात भरडलेले प्रेमी अशा वागणूकीनं अजून खचून जातात. बऱ्याचदा त्यांच्या मनातील भावनेचा उद्रेक होऊन आत्महत्या, खूण, बलात्कार, ऍसिड हल्ले अशा गंभीर घटना घडतात. म्हणूनच एकतर्फी प्रेमींनी वस्तुस्थितीचा स्वीकार करून काही गोष्टी केल्या, तर त्यांच भविष्यातील जीवन सुलभ होऊ शकते.
त्या व्यक्तीबद्दल कल्पना करणे थांबवा- एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रेमींच्या ध्यानी, मनी, स्वप्नी फक्त तिच व्यक्ती असते. साहजिकच आपल्या प्रत्येक स्वप्नात ती असते. त्यामुळे आपण तिच्याशिवाय जगूच शकणार नाही, अशी कल्पना केली जाते आणि यातूनच खरी समस्या होते. त्यामुळे आपण असा काल्पनिक विचार करणं टाळावं आणि वास्तववादी विचार करावा. त्यांची छायाचित्रेही काढून टाकावीत आणि त्या व्यक्तीसोबत असण्याच्या सर्व शक्यतांचा विचार करणं थांबवावं. हे करताना सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल, परंतु भविष्यात ते तुमच्यासाठी चांगले सिद्ध होईल.तुमचे मॅसेज पुन्हा पुन्हा वाचू नका- तुमच्या दोघांचे मेसेजवरचे संभाषण पुन्हा-पुन्हा वाचणे थांबवा. हा संदेश वाचून जुन्या आठवणी ताज्या होतील, ज्यातून दुःखाशिवाय काहीच मिळणार नाही. पुढे जाण्याच्या मार्गात हे देखील अडथळा ठरेल. तुमच्यात आणि त्यांच्यात खूप बोलणं झालं असेलही, पण तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल तर तुम्हाला तुमच्या भूतकाळात सतत डोकावणं थांबवावं लागेल. .स्वत:वर लक्ष ठेवा- त्या व्यक्तीशिवाय तुम्ही कोण आहात?' हे स्वतःला विचारा. तुम्हाला उत्तर मिळून जाईल. त्या व्यक्तिशिवायही तुमचे अस्तित्व आहे आणि तुम्ही तुमच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाकडे आणि क्षमतेकडे पाहू शकता. तुमच्यावर प्रेम नसलेल्या व्यक्तीच्या नादात या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं हे तुमच्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःचे लाड स्वतः करा. तुमचा आनंद कोणालाही हिरावून घेऊ देऊ नका.स्वत:मध्ये बदल- तुम्ही कधी तुमची स्टाईल बदलण्याचा किंवा केशरचना बदलण्याचा विचार केला आहे का? नसेल, तर यावेळी प्रयत्न का करू नये? स्वतःसाठी काहीतरी करण्याची हीच योग्य वेळ आहे. इतरांना प्रभावित करण्यासाठी नाही, स्वतःसाठी हा मेकओव्हर करा. तुम्ही हे मान्य करायला पाहिजे, तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम केले आहे, त्याच्या आयुष्यात तुमच्यासाठी कोणतंही स्थान नाही. सामाजिक जीवनात सक्रिय राहा- तुमच्या मित्रांसह बाहेर फिरायला जा, डेटिंग अॅप्ससाठी साइन अप करा आणि फक्त स्वतःसाठी तुमच्या जीवनाचा आनंद घेत रहा. आपण आपल्या क्रशची काळजी करू नये आणि तिने/त्यानं आपल्याला डेट केले नाही याबद्दल दु: खी होऊ नये. आपण याबाबतीत स्वतःचा विचार प्रथम करायला हवा. बाहेर जा, मित्रांसोबत वेळ घालवा, पार्ट्यांना हजेरी लावा, एकूणच तुमचे सामाजिक जीवन पुन्हा सक्रिय करा. हे तुम्हाला पुढे जाण्यास आणि पुन्हा नवीन प्रेमासाठी तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडण्यास नक्कीच मदत करेल.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.