तुमचा जोडीदार तुमच्यावर अधिकार गाजवतोय का? कसा ओळखाल डॉमेनिटिंग स्वभाव?
पती-पत्नीचे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे नात्यामध्ये प्रेम असते, पण हे नात खूप नाजूक असते की जे एका चूकीमुळे तुटू शकते. विशेषत: जेव्हा नात्यामध्ये एखादा व्यक्ती वर्चस्व गाजवू लागतो तेव्हा नातं ओझ वाटू लागते. पण तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल की तुमचा जोडीदार डॉमीनेटिंग आहे की नाही तुम्हाला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. ज्या गोष्टींना तुम्ही प्रेम समजत आहा त्या पार्टनरचे तुमच्यावर वर्चस्व गाजवणे असू शकते. अशा वेळी तुम्हाला सावध राहणे गरजे आहे.
जलस किंवा पझसिवनेसची भावना असणे -
जर तुमचा जोडीदार कोणाशी बोलल्यानंतर खूप जास्त जलस होत असेल तर त्यामध्ये काळजी करण्याचे काही कारण नाही. ईष्या ही काही प्रमाणात नकारात्मक असते. अशा वेळी तुमचा जोडीदार तुमच्यावर अधिकार गाजवतात आणि मित्रांपासून दूर राहायाला सांगू शकतात.सतत त्याच्या पुढे-मागे करावे अशी अपेक्षा -
एका डॉमिनेटिंग व्यक्तीला वाटत असते की तुम्ही उपलब्ध असले मग तुमची काही अवस्था असली तरी त्यांना काही फरक पडत नाहीय. अशा वेळी जोडीदाराला नाही बोलणे तुमच्यासाठी अवघड असते, पण तुम्ही नकार देण्याची हिम्मत दाखवली तर त्यांना प्रचंड राग येतो.स्पेस न देणे -
कोणत्याही नात्यामध्ये वयैक्तिक वेळ गरजेचा असतो हे जर तुमचा जोडीदार समजू शकत नसेल आणि कोणत्याही पश्चाताप न बाळगता सर्व मर्यादा ओलांडत असेल तर त्याचा स्वभाव डॉमीनेटिंग स्वभावाचा आहे. तुमच्या जोडीदाराला तुम्ही काय याचे काही देणे घेणे नसते, फक्त हेच गोष्टीचे पडलेले असते की तुम्ही तुमच्या कामामध्ये त्याला विचारता की नाही.तुमच्या मित्रांना नावे ठेवणे -
डॉमेनेटिंग पार्टनर तुमच्या मित्र आणि मैत्रिणी आणि जवळच्या लोकांची नींदा करतात. त्यांच्यामध्ये सतत काही नाही काही दोष शोधत असतात आणि त्यांनी कमी लेखण्याची एक संधीही सोडत नाही. ते तुमच्यावर अधिकार गाजवून सर्वांपासून लांब ठेवण्याचा, कोणालाही न भेटण्याचा प्रयत्न करू शकतो.प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला दोष देणे -
वर्चस्व गाजवणारा जोडीदार प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला दोष देतो, जरी ती त्याची चूक असली तरीही. तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा हा त्याचा मार्ग आहे. यासाठी तो तुमच्यासोबत भांडण करू शकतो. आणि तुमच्यावर हात उचलू शकतो.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.