अनेकांना पावसाळा खूप आनंददायी वाटतो, पण या दिवसात अनेक समस्या उद्भवतात. आजकाल अनेकजण बाहेर जाण्यापूर्वी स्वतःला ओले होण्यापासून वाचवण्याबरोबरच, आपल्या गॅझेटची विशेष काळजी घेतात. विशेषतः स्मार्टफोन, कारण पाण्याचा एक थेंब तुमच्या फोनला हानी पोहोचवू शकतो. एवढेच नाही तर बऱ्याच वेळा आपण घरगुती कामात इतके बिझी होतो की आपण फक्त ओल्या हातांनी फोन वापरू लागतो.
या सवयी तुमचा फोन खराब करू शकतात. जर पाण्याचा एक थेंब स्मार्टफोनमध्ये गेला तर ते काम करणे थांबवू शकते. म्हणूनच, जेव्हा तुम्ही पावसाळ्यात बाहेर जाल, तेव्हा तुमचा स्मार्टफोन काळजीपूर्वक ठेवा. यानंतरही जर तुमचा मोबाईल पाण्यात भिजला असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. जर तुमचा स्मार्टफोन पावसाच्या पाण्यात ओला झाला असेल तर या ट्रिक्स नक्की वापरून पहा. याशिवाय जर स्मार्टफोन पाण्यात पडला तर या गोष्टी लक्षात ठेवा.
तुमचा फोन स्विचऑफ करा
पाऊस येईल असे तुम्हाला जाणवले तर फोन ओला होऊ शकतो ,असे वाटताच लगेच तुमचा फोन बंद करा. खरं तर, फोन सुरु झाल्यावरच पाणी सर्किटला नुकसान करेल, ज्यामुळे तो खराब होऊ शकतो. म्हणूनच, पाण्यात भिजण्यापूर्वी आपला स्मार्टफोन स्विचऑफ करा.फोन नॅपकिनने स्वच्छ करा
जर तुमचा स्मार्टफोन ओला झाला असेल तर ते स्वच्छ आणि कोरड्या नॅपकिनने ताबडतोब पुसून टाका. त्यानंतर, बॅटरी किंवा सिम कार्ड काढा आणि टिश्यू पेपरने स्वच्छ करा. जर तुम्ही घरी असाल तर ताबडतोब तुमचा फोन 24 तास कच्च्या तांदळामध्ये ठेवा. जर तुम्ही बाहेर असाल तर ते टिश्यू पेपरने रॅप करा. हे फोनमध्ये असलेले एक्स्ट्रॉ मॉइश्चरायझर शोषण्याचे काम करते. यासाठी तुम्ही भरपूर टिश्यू पेपर घ्या आणि त्यात तुमचा फोन रॅप करा.
हेअर ड्रायरने वाळवण्याची चूक करू नका
जेव्हा घरी काम करत असताना स्मार्टफोन पाण्यात जातो, तो बाहेर काढण्याची आणि हेअर ड्रायरने सुकवण्याची चूक करू नका. असे केल्याने स्मार्टफोनमध्ये असलेले इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेंट्सचे नुकसान होऊ शकते. याशिवाय, ते सुकविण्यासाठी नैसर्गिक मार्ग निवडा, जसे कच्चा तांदूळ, ब्लॉटिंग पेपर किंवा सूर्यप्रकाश. तसेच जर तुम्ही तुमचा फोन ओपन केल्यानंतर सर्व गोष्टी उन्हात सुकवत असाल तर लक्षात ठेवा की ते एका तासापेक्षा जास्त काळ ठेवू नका. असे केल्याने स्मार्टफोनच्या प्लास्टिक भागांचे नुकसान होऊ शकते.स्मार्टफोन ओला असताना फोन चार्ज करू नका
जर तुमचा स्मार्टफोन ओला झाला, तर लगेच चार्जिंग लावू नका. असे केल्याने शॉर्ट सर्किट होऊ शकते ज्यामुळे फोन पूर्णपणे खराब होईल. बऱ्याच वेळा लोकांच्या या चुकीमुळे फोन पूर्णपणे खराब होतो, जो ठिकही करता येत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की स्मार्टफोन पाण्यात भिजल्यामुळे व्यवस्थित काम करत नाही, तर ताबडतोब सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन चेक करा.स्मार्टफोनला ओलाव्यापासून वाचवा
पावसाळ्यात केवळ अन्नपदार्थच नव्हे तर गॅजेट्स देखील ओलाव्यापासून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. पावसात फोन ओला होऊ नये म्हणून स्मार्टफोनच्या देखभालीची विशेष काळजी घ्या. एवढेच नाही तर कधीकधी ओलाव्यामुळे फोन देखील खराब होतात. म्हणून, वेळोवेळी कच्चा तांदूळ किंवा ब्लॉटिंग पेपरने रॅप करा.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.