Weight  Sakal
फोटोग्राफी

weight Gain Tips - 'हे' पदार्थ खा, वजन वाढवा!

स्नेहल कदम

दिवसभरात अनेक पदार्थ खाऊन आणि योग्य प्रमाणात डायट प्लॅन करुनही वजन वाढत नाही, ही अनेकांची समस्या असते. मग अशावेळी वजन वाढवण्यासाठी अनेक सल्ले ऐकून आपण त्याप्रमाणे कृती करत असतो. पण कितीही खाल्ले तरी माझे वजन वाढत नाही, ही समस्या स्वस्थ बसू देत नाही. मात्र आपण किती खातो? यापेक्षा काय खातो? हे महत्वाचे आहे. यासाठी आज काही अशा महत्वाच्या घटकांची माहिती सांगणार आहोत, जी तुम्हाला वजन वाढवण्यासाठी उपयोगी पडतील.

पनीर पनीर खाल्ल्याने वेगाने वजन वाढण्यास मदत होते. तुम्ही करपूस पनीर तळून, त्यावर चाटमसाला टाकून खाऊ शकता. किंवा पनीरची भाजीही बनवुनही खाऊ शकता.
पीनट बटर पीनट बटर पौष्टिक खाद्य पदार्थांपैकी एक महत्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. दररोज तुमच्या खाण्यात याचा वापर करत असेल तर ते आरोग्यासाठी फायद्याचे होते. ब्रेड किंवा चपाती सोबत तुम्ही पनीट बटर खाऊ शकता.
दही वजन वाढवायचे आहे मग तु दही खा! असा सल्ला अनेकजण देतात. तो बरोबरही आहे. बऱ्याचवेळा आपण थंडीच्या दिवसांत दही खाणे टाळतो. परंतु दह्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असल्याने याचा वापर वजन वाढवण्यासाठी होतो.
दूध आहारतज्ज्ञ दिवसभरात दोन वेळेस दूध पिण्याचा सल्ला देतात. सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेस दूध पिल्याने त्याचा शारीराला चांगला फायदा होतो.
बटाटा बटाटे खाल्ल्याने वजन वेगाने वाढण्यास मदत होते. नियमित बटाटे खाल्ल्याने वजन वाढते. बटाट्याची भाजी किंवा उकडून बटाटे खाल्ल्याने तुमचे वजन तुलनेत वाढते. शिवाय तुम्ही जीम जॉईन केले असाल तर तुम्हाला बटाटा खाण्याचा सल्ला दिला जातो.
बेदाणे वजन वाढण्यासाठी बेदाणे मदत करतात. फावल्या वेळात तुम्ही बेदाणे खाऊ शकता.
केळी बॉडी वाढवणारे किंवा वजन वाढवणारे अनेकजण सर्रास केळी खातात. वजन वाढवण्यासाठी केळी हा सर्वोत्तम घटक मानला जातो. नियमित केळी, केळीचा ज्युस पिल्याने वजन वाढण्यास मदत होते.
अंडी नियमीत अंडी खाल्ल्याने तुमचे वजन वाढण्यास मदत होते. अंडी खाल्ल्याने हे शरीरसाठी उत्तम मानले जाते. आहारतज्ज्ञ उकडलेल्या अंड्यातील पांढरा बलक खाण्याचा सल्ला देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT