काही लोकांना केळी खायला आवडते. केळी पौष्टिक गुणांनी परिपूर्ण आहे. त्यात पोटॅशियम, लोह आणि जीवनसत्त्वे असतात. आरोग्यासाठी केळी खूप फायदेशीर आहे. अनेकांना रोजच्या आहारात केळी खाणे आवडते. पण समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा केळी 4-5 दिवस साठवावी लागते. या सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही एका आठवड्यासाठी केळी साठवू शकता.
केळीच्या देठाला रॅप करा (गुंडाळा):
जेव्हाही तुम्ही बाजारातून केळी विकत घेता, सर्वप्रथम घरी आल्यानंतर कागद किंवा प्लास्टिकने त्याचा देठ गुंडाळा. असे केल्याने केळी लवकर खराब होणार नाही.केळी स्टोर करा.
केळी बऱ्याच दिवस साठवण्यासाठी, केळी रुम टेंपरेचरवर ठेवा. फ्रिज किंवा कोणत्याही उबदार ठिकाणी केळी लवकर खराब होतात.व्हिटॅमिन सीच्या वापराने केळी खराब होणार नाही:
अनेक दिवस केळी साठवण्यासाठी, व्हिटॅमिन सी टॅब्लेट एका ग्लासच्या पाण्यात विरघळवून घ्या आणि नंतर त्यात केळी बुडवा. यामुळे केळी लवकर खराब होणार नाही.केळी पेपर किंवा प्लॅस्टिकमध्ये गुंडाळा:
केळी पेपर किंवा प्लॅस्टिकमध्ये गुंडाळल्याने ती लवकर खराब होत नाही.हँगरमध्ये केळी लटकवा:
जर तुम्ही केळी हँगरमध्ये लटकवली तर केळी लवकर खराब होणार नाहीत. हे विचित्र वाटेल पण हे खरे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.