flirting in office esakal
तुमच्या नवऱ्याशी (husband) त्याच्या ऑफिसमध्ये कोणी फ्लर्ट (flirt) करत असेल तर बायको म्हणून तुम्हाला राग येणं अगदी साहजिक आहे. त्याच्या ऑफिसमध्येच (office) हा प्रकार चालत असल्याने तुम्हाला आणखी अवघडल्यासारखं वाटू शकतं. अशा काही स्त्रिया आहेत ज्यांना लग्न झालेल्या पुरूषांशी फ्लर्ट करायला आवडतं. काही स्त्रिया याकडे आव्हान म्हणून तर काही मजा म्हणून बघतात. पण जेव्हा एखादी मुलगी तुमच्या नवऱ्यासोबत फ्लर्ट करतेय तेव्हा तुमचा नवरा त्याला कसा प्रतिसाद देतोय ते पाहणे महत्वाचे आहे. कारण त्यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पण अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा राग ढळू देऊ नका. काळजीपूर्वक वागा. जर कामाच्या ठिकाणी तुमच्या नवऱ्यासोबत कोणी फ्लर्ट करत असेल तर तुम्ही काही गोष्टी नक्कीच करू शकता.
तिच्याशी मैत्री करा-
जेव्हा तुमचा नवरा तुम्हाला एखादी मुलगी फ्लर्ट करतेय असं सांगतो तेव्हा त्या मुलीवर लगेच रागवू नका. उलट तिच्याशी मैत्री करा. तिच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्ही तिला खूप चांगल्या,मनमिळावू दयाळू असल्याचे जाणवेल. अशा व्यक्तीच्या नवऱ्याला जाळ्यात ओढताना त्याच्या पत्नीला दुखावताना तिला अस्वस्थ वाटू लागेल. असे केल्याने त्या मुलीच्या वागण्यात तुम्हाला बदल जाणवू शकेल. नवऱ्याशी संवाद साधा-
जर तुमचा नवरा दुसऱ्या मुलीकडे आकर्षिला गेला असेल तर तुम्हाला नवऱ्याशी सामना करताना खूप वाईट वाटू शकते. अशावेळी मनावर ताबा ठेवून नवऱ्याशी शांतपणे बोला. त्याला काही शंका आहेत का ते विचारा. ते दोघे किती जवळ आले आहेत, याबद्दल थेट विचारू नका. तुमच्या नवऱ्याला कदाचित राग येईल. पण तुम्हा दोघांना याबद्दल काय वाटते याविषयी शांतपणे संवाद साधा. तुमच्या वैवाहिक जीवनाकडे अधिक लक्ष द्या-
तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर चुकीच्या वागल्या आहात का? असे असेल तर त्याचा राग आल्याने तुमचा नवरा त्या महिलेशी अनावधानाने बोलण्याची शक्यता आहे. असे झाल्यास तुमच्या संवादात दरी निर्माण झाल्याचे समजा आणि ही दरी दूर करून पुन्हा नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याशी बोला, डिनर डेटवर जा आणि एकमेकांवर मनापालून प्रेम करा. त्याच्यावर विश्वास ठेवा -
अशा परिस्थितीत नवऱ्यावर अविश्वास ठेवणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण, असे करणे टाळा. इथे त्या दुसऱ्या स्त्रीची चूक आहे. तुमच्या नवऱ्याची नाही. त्याने त्या स्त्रीला प्रोत्साहन दिलेले नाही, असे म्हटले तर त्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल.
याबद्दल हसत रहा -
आणखी एक करून पाहा, तुम्ही संपूर्ण परिस्थितीमुळे नवऱ्यावर शंका घेण्याऐवजी आणि राग येण्याऐवजी हसत का नाही? जो फक्त तुमचाच आहे त्याला ती आपलंस करू पाहतेय. त्यामुळे तुमचा जर नवऱ्यावर पूर्ण विश्वास असेल तर तीला फार डोक्यावर चढवू नका. पण, ही परिस्थिती डोक न फिरवता शांतपणे हाताळल्यास तुम्हाला जास्त आनंद होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.