New Year Commitment Esakal
NEW YEAR 2022: नवीन वर्षात काहीतरी नवा संकल्प करण्याचा विचार तुम्ही करत असाल. परंतु कोणता संकल्प करावा याबाबत तुमचा गोंधळ होत असतो. तुमची मदत व्हावी, यासाठी आम्ही तुम्हाला काही साधे सोपे संकल्प सांगणार आहोत.
1. वाचनाची सवय लावा (habit of reading) - वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. नवीन वर्षात वाचनाची सवय लावून घ्या.2. रोजनिशी लिहा (Diary)- रोजनिशी लिहील्यामुळे आपण केलेल्या दिवसभरातील घटना नजरेसमोरून जातात. त्यामुळे आपल्याकडून झालेल्या चुका आपल्याला सुधारता येतात. 3. आरोग्याची काळजी घ्या (Health)- आरोग्य हे सर्वात मोठं वैभव आहे, हे कोरोनानं दाखवून दिलं आहे. त्यामुळे नव्या वर्षात आरोग्याची विशेष काळजी घ्या.4. व्यायाम करा (Exercise) - व्यायामाने शरीर सुदृढ होतं, त्याचबरोबर ते निरोगीसुद्धा होतं. त्यामुळे रोज साधारणपणे ३० मिनिटे व्यायाम करा. 5. नवीन मित्र जोडा (Friends)- आयुष्यात मित्रांचं स्थान नेहमीच महत्त्वाचं असते. तुमच्या प्रतिकूल काळात ते तुमची साथ तर देतातच शिवाय तुमच्या चांगल्या काळात तुमचा आनंद अजूनही वाढवतात. म्हणून नवे मित्र जोडा.6. मेहनत करा (Hardwork)- यशस्वी व्हायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही. कारण यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते. 7. लोकांना खोट्या आशा दाखवू नका (Don't Lie)- लोकांना खोट्या आशा दाखवणे ही वाईट सवय आहे. त्यामुळे तुम्ही तात्पुरते लोकांना खुश कराल. परंतु नंतर लोकांपुढे तुमची प्रतिमा खोटारडा अशीच तयार होईल. 8. आर्थिक बचत करा (Save Money)- सध्याच्या काळात पैसा ही सगळ्यात महत्त्वाच्या गरज आहे. तुमच्याकडे पैसे असतील तर तुमचं जगणं सुकर होईल.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.