लहान मुलांना मानसिकरित्या हेल्दी आणि जीनियस बनवण्यासाठी त्यांना रोज फळे खाऊ घाला. यामुळे त्यांचा मेंदू हेल्दी आणि त्यांची मेमरी शार्प राहण्यास मदत होईल. काही फूड स्पेशली मेंदूकरिता खूप फायदेशीर असतात. तसेच मेंदूला हेल्दी ठेवण्यासाठी आणि मेमरीला शार्प करण्यासाठी याचा उपयोग होतो. या ब्रेन फुड्स संदर्भात सविस्तर न्युट्रीशनिस्ट मेघा मुखीजा काही टिप्स सांगत आहे. चला तर मग जाणून घेऊयात.
डार्क चॉकलेट :
लहान मुलांना चॉकलेट खायला खूप आवडते. त्यातीलच डार्क चॉकलेटमध्ये अॅन्टी ऑक्साईड असतात. जे मेमरी आणि मेंदूच्या हिस्सामध्ये ब्लड वेसल्सच्या ग्रोथला वाढवण्याचे काम करते. त्यामुळे लहान मुलांना डार्क चॉकलेट खाण्यापासून अडवू नका.
अक्रोड :
मेंदूच्या आकाराच्या या फळामध्ये पॉलिफेनोल, विटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी अॅसिडसुद्धा भरपूर प्रमाणात असते. जे कौशल्यासाठी आणि कॉग्निटिव क्षमता वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे लहान मुलांना अक्रोड खायला देत चला. गाजर :
गाजरमध्ये ल्युटोलिन असतात जे मेंदूच्या कार्याला अधिक चांगले बनवतात. गाजर खाल्ल्यास एकाग्रता आणि ध्यान वाढवण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुमच्या मुलांना गाजर खाण्याची सवय लावा. बेरी :
बेरीमध्ये असलेले अॅन्टी ऑक्साईड ब्रेन सेल्समधील कम्युनिकेशनमध्ये सुधार करण्यासाठी मदत करते. तसेच एकूण कामकाजास प्रोत्साहन देणारी प्लॅस्टिसिटी वाढवते. त्यामुळे लहान मुलांना बेरी खायला दिल्यास ते खूप फायदेशीर ठरते. टरबुजाच्या बिया :
टरबुजाच्या बियामध्ये झिंक, मॅग्नेशियम, तांबे आणि लोहचा समृद्ध स्त्रोत असतो. तसेच यात ओमेगा 3 फॅटी अॅसिडसुद्धा असते. जे मेमरीला वाढवण्यासाठी मदत करते. म्हणून तुमच्या मुलांना भोपळ्याच्या किंवा टरबुजाच्या बिया खायला देत चला. हळद :
आपल्या स्वयंपाक घरात हळदीचा वापर आपण नेहमीच करतो. त्याच हळदीमध्ये अॅन्टी ऑक्साईड असतात. जे मेंदूमध्ये रक्त प्रवाह उत्तेजित करते. शरीरामध्ये हळद ऑस्किडेटेव तणाव कमी करते. त्यामुळे लहान मुलांच्या आहारामध्ये हळदीचा वापर करत चला. आयोडीन मीठ :
आयोडीनच्या कमीमुळे मेमरी लॉस आणि थॉयराइडच्या समस्या होऊ शकतात. यामुळे लहान मुलांच्या डाएटमध्ये मिठाचा वापर करत चला. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.