Dr Babasaheb Ambedkar jayanti esakal
प्राथमिक शिक्षण (सन १९००) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ७ नोव्हेंबर १९०० मध्ये साताऱ्यातील सरकारी शाळेतून शिक्षणाला सुरुवात झाली. हाच दिवस महाराष्ट्र सरकारद्वारे शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या ही शाळा प्रतापसिंह हायस्कूल नावानं ओळखली जाते. त्यावेळी ही शाळा केवळ पहिली ते चौथी पर्यंतच होती. याठिकाणीच चौथीपर्यंत बाबासाहेबांचं शिक्षण झालं. (फोटो - गुगल)
एलफिस्टन हायस्कूल (सन १९०४-१९०७) : साताऱ्यातून आंबेडकरांचं कुटुंब मुंबईत दाखल झाल्यानंतर बाबासाहेबांचं मॅट्रिकपर्यतंचं शिक्षण एलफिस्टन हायस्कूलमध्ये झालं. या हायस्कूलमध्ये शिक्षण घेणारे ते पहिले अस्पृश्य समाजातील व्यक्ती होते. वयाच्या १५ व्या वयापर्यंत त्यांनी इथं शिक्षण घेतलं. (फोटो - गुगल)
एलफिस्टन कॉलेज (सन १९०८-१९१२) : मॅट्रिक यशस्वीरित्या पास झाल्यानंतर बाबासाहेबांनी एलफिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या ठिकाणी त्यांचं इंटरपर्यंतचं शिक्षण झालं. याठिकाणी त्यांचं बीए, एमएपर्यंतच शिक्षण पार पडलं. (फोटो - गुगल)
कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क (सन १९१३-१९१५) : वयाच्या २२ व्या वर्षी पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी बाबासाहेब अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठात गेले. या ठिकाणी शिक्षणासाठी त्यांना बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्तीवर पाठवलं. या विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली. (फोटो - गुगल)
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (सन १९१६-१९२१-१९२३) : यानंतर बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एमएससीच्या शिक्षणाासाठी दाखल झाले. याठिकाणी त्यांनी आपल्या शोधनिबंधावर काम केलं. त्यांच्या शोधनिबंधाचं नाव होतं 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी : इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन'. लंडन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी डीएससीचं शिक्षण पूर्ण केलं. (फोटो - गुगल) गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, मुंबई विद्यापीठ - मुंबई विद्यापीठाच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्येही बाबासाहेब शिकले. या कॉलेजमधून भारतातील अनेक दिग्गज लोक शिक्षण घेऊन बाहेर पडले. यामध्ये डॉ. आंबेडकर, लोकमान्य टिळक, न्या. सीएम चागला, सर मोतिलाल सेटलवाड, न्या. वाय व्ही चंद्रचूड, नानी पालखीवाला यांचा समावेश आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.