Belly Fat Loss and Weight Loss esakal
Weight Loss Tips in Winter: अलीकडे प्रत्येकाला स्लिम आणि फिट (Slim and fit) दिसायचंय, पण हे सुख सगळ्यांच्याय नशिबी येत नाही. पोटाची चरबी (Belly fat) कमी करणं हे एक आव्हान असतं. त्यातच हिवाळ्याच्या दिवसात भूक (Appetite) जास्त लागते आणि दिवस लहान असल्यामुळे शारीरिक हालचालही कमी होते. त्यामुळे पोटाची चरबी आणखीच वाढते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायामासोबतच आहाराचीही (Diet) काळजी घ्यावी. आज आपण अशा पाच गोष्टी जाणून घेणार आहेत ज्या खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होते. चला, जाणून घ्या काय आहेत त्या गोष्टी! (with exercise, diet should be taken care of to lose weight and reduce belly fat)
1. मूग डाळ (Moong Dal)- पोटाची चरबी कमी करण्यासाठी मूग डाळ खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही नाश्त्यात मूग डाळ खाल्ली, तर तुमच्या पचनासाठी (Digestion) खूप चांगले असते. मूग डाळ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. 100 ग्रॅम मूग डाळीमध्ये 24 ग्रॅम प्रथिने (Protein) असतात. त्यामुळे मूग डाळ आहारात असणं फायदेशीर आहे.2. ग्रीन टी (Green Tea)- ग्रीन टी हा आरोग्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. तो प्यायल्याने लठ्ठपणा (Obesity) कमी होतो. विशेषत: जर तुम्ही साखरेच्या चहा किंवा कॉफीऐवजी ग्रीन टी वापरत असाल तर तुमच्या पोटाची चरबीही कमी होते. याशिवाय ग्रीन टीच्या सेवनाने कॅन्सरपासून (Cancer) बचाव होतो.3. पालक (Spinach)- पालकमध्ये जीवनसत्त्वे (Vitamins) आणि अनेक फायदेशीर फायटोकेमिकल्स (Phytochemicals) आढळतात. शरीरात लोहाची कमतरता (Iron deficiency) असलेल्या लोकांनी पालक खाणे आवश्यक आहे, तर पालक सेवन केल्याने तुमचे वजन कमी (Weight loss) होण्यास मदत होते, त्यामुळे महिन्यातून 15 दिवस त्याचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे.4. संत्रा (Orange)-
संत्रा तुमच्या त्वचेसाठीही (Healthy For Skin) खूप चांगला मानला जातो. तसेच याच्या मदतीने तुम्ही पोटाची चरबी सहज कमी करू शकता. जर तुम्हाला संत्री खायला आवडत नसेल तर तुम्ही रिकाम्या पोटी संत्र्याचा रस देखील पिऊ शकता.5. फ्लेक्ससीड (Flexseed)- फ्लेक्ससीडमध्ये व्हिटॅमिन ई (Vitamin E) आणि ओमेगा ३ (Omega 3) फॅटी अॅसिड अल्फा-लिनोलेनिक अॅसिड (Fatty Acids Alpha-Linolenic acid) मुबलक प्रमाणात असते. फ्लेक्ससीड लाडू बनवून तुम्ही ते खाऊ शकता. फ्लॅक्ससीड पावडर कोमट पाण्यासोबत सकाळ संध्याकाळ खाल्ल्याने पोटाची चरबी खूप कमी होते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.