भारतातील अनेक राज्ये आता हळूहळू पर्यटकांसाठी आपले दरवाजे उघडत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही लहान प्रवासाचे प्लॅनही करू शकता. लक्षात ठेवा की कोरोना विषाणूच्या साथीचा धोका अद्याप संपलेला नाही, म्हणून गर्दी नसलेल्या ठिकाणीच जा. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही सुंदर गावांबद्दल सांगत आहोत, जिथे पर्यटकांची गर्दी दिसणार नाही. तुम्ही एकदा या ठिकाणांना अवश्य भेट द्या.
मलाना, हिमाचल प्रदेश: कुल्लू खोऱ्यात वसलेले हे प्राचीन गाव ट्रेकर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. लोक या ठिकाणाच्या शांततेकडे आकर्षित होतातजंजेहली, हिमाचल प्रदेश: मंडी जिल्ह्यात वसलेले हे गाव शांत जागा शोधणाऱ्यांसाठी आराम करण्यासाठी योग्य ठिकाण आहे. येथे हायकिंग, ट्रेकिंग, नाईट सफारी सारख्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतात.मावलीनॉन्ग, मेघालय: आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाणारे, मेघालयातील हे छोटे गाव शिलाँग शहरापासून सुमारे 78 किमी अंतरावर आहे. येथील स्थानिक लोक खूप प्रेमळ आणि मदत करणारे आहेत.रावांगला, दक्षिण सिक्कीम: कंचनजंघाची बर्फाच्छादित शिखरे पाहणे हे रवांगलाच्या या गावातील मजाच काहीच ओर आहे. हे ठिकाण विविध हिमालयीन पक्ष्यांचे घर आहे, त्यामुळे सांयकाळी तुम्ही बाहेर बसून पक्ष्यांच्या अनेक प्रजाती पाहू शकता.चितकुल गाव, हिमाचल प्रदेश: भारत-चीन सीमेवर स्थित चितकुल गावात बरीच नयनरम्य आकर्षणे आहेत. तुम्हाला इथे जो अनुभव येईल तो हिमाचल प्रदेशच्या इतर भागांपेक्षा वेगळा आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.