बॉलीवूडच्या bollywood चित्रपटांची जादू सगळ्या जगभर आहे. हटके विषय, त्यांची प्रभावी मांडणी, दिग्दर्शन, निर्मिती कौशल्य, आणि लक्षवेधी संवाद यामुळे बॉलीवूडच्या चित्रपटांची क्रेझ ही वेगवेगळ्या देशांमध्ये पाहायला मिळते. उदाहरण सांगायचे झाल्यास आमीरचा दंगल dangal आणि थ्री इडियट्स 3 idoits या चित्रपटांना चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. आपल्याकडील काही चित्रपट असे आहेत त्यांच्यावर शेजारील राष्ट्रात बंदी घालण्यात आली होती. आपण त्या चित्रपटांविषयी माहिती घेणार आहोत. ते चित्रपट भारतात यशस्वी झाले. त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. वेगळे विषय आणि त्याची प्रभावी मांडणीनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
राजी- raazi
मेघना गुलजार दिग्दर्शित राजी या चित्रपटानं जगभरात लोकप्रियता मिळवली. अभिनेत्री आलिया भट्टची या चित्रपटात प्रमुख भूमिका होती. तिनं गुप्तहेराची भूमिका केली. तिची ही भूमिका लोकप्रिय झाली. तिच्या त्या भूमिकेचं कौतूकही झालं. पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाचं असं म्हणणं होतं की, यातील आशय हा वादग्रस्त स्वरुपाचा आहे. त्यात पाकिस्तानला नकारात्मक स्वरुपात दाखविण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट पाकिस्तानमध्ये बॅन आहे.
मुल्क- mulk
पाकिस्तानातल्या सेन्सॉर बोर्डानं अनुभव सिन्हाद्वारा दिग्दर्शित मुल्क चित्रपटावर बंदी आणली. त्या चित्रपटामध्ये एका मुस्लिम परिवाराची कहाणी सांगण्यात आली आहे. त्या कुटूंबावर ते आतंकवादी असल्याचा आरोप होतो. त्यानंतर ते प्रकरण कोर्टात जातं. बनारस या शहरामध्ये घडणारं हे कथानक प्रेक्षकांची पसंती मिळवून गेलं. या चित्रपटामध्ये ऋषी कपूर, तापसी पन्नु, आशुतोष राणा, यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
फैंटम- fantom
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या फँटमनं पाकिस्तानमध्ये चर्चेला तोंड फोडलं होतं. पाकिस्तानी आतंकवादी आणि मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी हाफिज सईद याच्यावर आधारित हा चित्रपट होता. त्यात सैफ अली खान आणि कॅटरीना कैफ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.
नाम शबाना- naam shabana
बॉलीवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नुनं नाम शबाना मधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटामध्ये तिनं एका बॉक्सर आणि अंडरकवर एजेंटची भूमिका साकारली होती. तापसीच्या जोडीला अक्षय कुमार, मनोज वाजपेयी यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका होत्या.
बेबी- baby
बॉक्स ऑफिसवर बेबी हा चित्रपट कमालीचा यशस्वी झाला होता. २०१५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पाकिस्तानात हा चित्रपट बॅन करण्यात आला होता. बेबी मध्ये एका भारतीय एजंटाची कथा मांडण्यात आली आहे. तो पाकिस्तानातील एका दहशतवाद्याला कशाप्रकारे पकडतो हे त्यात दाखविण्यात आले होते. अक्षय कुमारनं त्यात प्रमुख भूमिका साकारली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.