15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शूर पुत्रांनी आपले प्राण पणाला लावले. आज आपण जरी पुढे गेलो असलो तरी कोणताही भारतीय तो दिवस विसरू शकणार नाही. दरवर्षी 15 ऑगस्टला देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संदेश देतात आणि ही चित्रे इतिहासाच्या पानांमध्ये नोंदली जातात. पण तुम्ही कधी स्वातंत्र्याच्या काळाची चित्रे पाहिली आहेत का? कदाचित नाही, चला तर मग 1947 ची काही दुर्मिळ चित्रे पाहूयात. जी तुम्ही यापूर्वी क्वचितच पाहिली असतील. जी तुम्हाला नक्कीच आवडतील.
या चित्रात दिसून येतेय की, भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन हे भारताच्या नेत्यांसोबत बसून सत्ता हस्तांतरणाची तयारी करत आहेत. हा फोटो भारताच्या स्वातंत्र्याच्या 11 दिवसांपूर्वीचा आहे.देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट रोजी सांयकाळी संविधान सभेला संबोधित केले. या दरम्यान त्यांनी स्वतंत्र भारताच्या नावे पहिले संबोधन केले. या चित्रात तुम्ही पाहू शकता की जवाहरलाल नेहरू भाषण देत आहेत.15 ऑगस्टच्या सकाळी, परिसर आणि रस्ते लोकांनी गजबजलेले होते, कारण लोकांनी 15 ऑगस्टच्या सकाळी कोलकात्यातील रस्त्यावर आणि चौकातून बाहेर पडून स्वातंत्र्य दिन साजरा केला. या चित्रात तुम्ही हे दृश्य स्पष्टपणे पाहू शकता.सध्या अनेक लोक इंडिया गेटला भेट देण्यासाठी जातात आणि तिथे त्यांचा वेळ घालवतात. जेव्हा देशाने स्वातंत्र्य दिनाची पहिली सकाळ पाहिली तेव्हा मोठ्या संख्येने लोक इंडिया गेटवर पोहोचले होते आणि त्यांनी येथे स्वातंत्र्य दिन साजरा केला.भारताच्या स्वातंत्र्यानंतर, काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली आणि या चित्रात तुम्ही पाहू शकता की पंडित जवाहरलाल नेहरू घोड्यावर बसून काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला जात आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.