Films On Independence Day Films On Independence Day
Films On Independence Day आज देश स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. यादरम्यान अनेक चढउतार, संघर्ष आणि विजयाच्या संधी आल्या. चित्रपटांमध्येही ते दिसून येते. बॉलिवूडमध्ये दरवर्षी देशभक्तीवर अनेक चित्रपट बनतात. ओटीटीच्या (OTT) युगात आम्ही तुम्हाला अशा देशभक्तीपर चित्रपटांबद्दल सांगणार आहोत जे घरी बसून पाहू शकता.
एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाने यशाचे झेंडे रोवले आहे. या चित्रपटात दोन क्रांतिकारकांची कथा दाखवण्यात आली आहे. तुम्ही नेटफ्लिक्स, डिजनी प्लस हॉटस्टार आणि झी५ वर पाहू शकता.‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हा इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांचा बायोपिक आहे. देशाचा विश्वासघात केल्याच्या खोट्या आरोपात त्यांना गोवण्यात आले. प्रदीर्घ लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video आणि Voot वर पाहू शकता.आलिया भट्टच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘राझी’. यामध्ये ती अंडरकव्हर रॉ एजंट सेहमत खानची भूमिका साकारली आहे. देशभक्तीचा खरा अर्थ हा चित्रपट शिकवतो. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर तुम्ही राझी पाहू शकता.विक्की कौशल स्टारर सरदार उधम हा आणखी एक उत्तम चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर आहे. चित्रपटाची कथा क्रांतिकारक सरदार उधम सिंग यांच्यावर आधारित आहे. याचे दिग्दर्शन शुजित सिरकार यांनी केले आहे.२०२१ मध्ये आलेल्या शेरशाहची कथा कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.विक्की कौशल स्टारर उरी : द सर्जिकल स्ट्राइक हा खऱ्या घटनांवर आधारित आहे. जेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. हा चित्रपट Zee५ वर आहे.शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावरील मेजर चित्रपटात आदिवी शेषाने मुख्य भूमिका साकारली होती. २००८ च्या मुंबई हल्ल्यात संदीप उन्नीकृष्णन शहीद झाले होते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.परमानु चित्रपटात जॉन अब्राहम, बोमन इराणी आणि डायना पेंटी आहेत. हा चित्रपट १९९८ मध्ये राजस्थानमधील एका गावात भारतीय लष्कराने केलेल्या गुप्त अणुबॉम्ब चाचणीची कथा आहे. हा चित्रपट Netflix आणि Zee५ वर आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.