india largest charging station for electric vehicles esakal
देशातील पाच राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. अशा परिस्थितीत तेलाचे भाव लवकरच वाढण्याची भीती लोकांना वाटत आहे. दरम्यान, वाहनधारकांना दिलासा देणारी बातमी आहे. गुरुग्राममध्ये नवीन चार्जिंग स्टेशन सज्ज झालयं. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
चार्जिंगची समस्या दूर राहणार-
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाहनधारक प्रचंड वैतागले आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरांचं बजेट बिघडलं आहे. अशा परिस्थितीत लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे झुकू लागले आहेत. मात्र, इलेक्ट्रिक वाहनधारकांना चार्जिंग करताना सर्वाधिक त्रास होतो. अशात लोकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. गुरुग्राममधील नवीन चार्जिंग स्टेशन पूर्ण झाले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक चालकांच्या अडचणी बऱ्याच अंशी दूर होतील.
देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन-
राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) गुरुग्राम येथे भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) चार्जिंग स्टेशन बांधले जाणार आहे. सेक्टर-86 मधील हे स्थानक Alektrify ने तयार केले आहे. विक्रमी ३० दिवसांत ते तयार करण्यात आले. नॅशनल हायवे फॉर इलेक्ट्रिक व्हेइकल्स (NHEV) ने हे स्टेशन सुरू केले आहे.गुरुग्राममधील 2 स्टेशन-
यापूर्वी आतापर्यंतचे सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन गुरुग्रामच्या सेक्टर-52 मध्ये होते. गेल्या महिन्यात याची सुरुवात करण्यात आली होती. वाहने चार्ज करण्यासाठी १०० पॉइंट्स बनवले होते. आता नव्या स्टेशनची भर पडल्याने गुरुग्राम ही देशातील दोन सर्वात मोठी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन ठरली आहेत.
स्टेशनमध्ये आहेच 121 पॉइंट-
या स्टेशनवर वाहने चार्ज करण्यासाठी 75AC, 25DC आणि 21 हायब्रीड असे एकूण 121 चार्जिंग पॉइंट आहेत. एकूण 121 पॉइंट असतील. यामुळे 24 तासांत 1 हजार इलेक्ट्रिक वाहनांना आरामात चार्ज करता येणार आहे.
डीसी चार्जर 1 तासात कार चार्ज करणार-
एसी चार्जरने इलेक्ट्रिक वाहन पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 तास लागतात आणि दिवसाला 4 गाड्या चार्ज होतात. स्टेशनवर असे 95 चार्जर असून, दिवसभरात 570 गाड्या विनाथांबा चार्ज करू शकतात.तर, डीसी फास्ट चार्जर एका तासात कार चार्ज करू शकतो आणि 24 तासात 24 कार चार्ज करू शकतो. असे 25 चार्जर आहेत जे एका दिवसात 600 इलेक्ट्रिक कारपर्यंत चार्ज करू शकतात.
नोएडात उभारणार स्टेशन-
त्याचबरोबर येत्या काळात नोएडा-ग्रेटर नोएडामध्येही अशी 2 स्टेशन्स उभारली जाणार आहेत. दोन्ही स्टेशन 60 दिवसांत तयार होतील. त्याचबरोबर जयपूर-दिल्ली-आग्रा महामार्गावरील आणखी 30 स्टेशन वाटपानंतर 90 दिवसांच्या आत विक्रमी वेळेत बांधण्यात येणार आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.