india vs west indies sakal
फोटोग्राफी

IND VS WI | विंडीज विरूद्ध भारताचे 'विराट' अस्त्र

Kiran Mahanavar

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. दरम्यान, दोन वर्षापासून शतकाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या विराट कोहलीला या मालिकेत आपला शतकांचा दुष्काळ संपवण्याची नामी संधी आहे. कारण, भारताकडून वेस्ट इंडीज विरूद्ध सर्वाधिक धावा करण्यात त्याचा हातखंडा आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडेमध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या 39 सामन्यांत 72 च्या सरासरीने 2235 धावा केल्या आहेत. कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध 9 शतके झळकावली आहेत.
या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने वेस्ट इंडिजविरुद्ध 39 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 52.43 च्या सरासरीने 1573 धावा केल्या आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय खेळाडूही तिसऱ्या स्थानावर आहे. हा खेळाडू म्हणजे रोहित शर्मा. रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या 33 एकदिवसीय सामन्यांमध्ये 60.92 च्या सरासरीने 1523 धावा केल्या आहेत.
डेसमंड हेन्सने भारताविरुद्ध 36 सामन्यांत 42.40 च्या सरासरीने 1357 धावा केल्या आहेत. या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.
सध्या टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड भारत-विंडीज वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत. द्रविडने विंडीजविरुद्ध 40 एकदिवसीय सामन्यांमध्ये 42.12 च्या सरासरीने 1348 धावा केल्या आहेत.
युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलची बॅटही भारताविरुद्ध जोरदार बोलली आहे. त्याने भारताविरुद्ध 41 एकदिवसीय सामन्यांमध्ये 32.53 च्या सरासरीने 1334 धावा केल्या आहेत.
या यादीत वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंद्रपॉल सातव्या स्थानावर आहे. त्याने 46 सामन्यांत 35.64 च्या सरासरीने 1319 धावा केल्या आहेत.
दोन देशांदरम्यान सर्वाधिक वनडे धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडिजचा रामनरेश सरवन आठव्या क्रमांकावर आहे. सरवनने 31 सामन्यांत 58.90 च्या सरासरीने 1296 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT