भारतीय वायुसेना (Indian Air Force) आज 89 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. हिंडन एअर बेसवर (Hindon Air Base) या निमित्तानं दरवर्षी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो.
भारतीय वायुसेना (Indian Air Force) आज 89 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. हिंडन एअर बेसवर (Hindon Air Base) या निमित्तानं दरवर्षी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. जगातील चौथ्या सर्वात शक्तिशाली हवाई दलाची सुरुवात केवळ 25 सैनिकांसह कशी झाली, हे आपण पाहू..भारतीय हवाई दलाची अधिकृत स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली. 1 एप्रिल 1933 रोजी त्याचे पहिले विमान उड्डाण अस्तित्वात आले. त्यात 6 अधिकारी आणि 19 हवाई सैनिक रॉयल एअर फोर्सद्वारे प्रशिक्षित होते. यात तत्कालीन 4 वेस्टलँड वापिती IIA या विमानांचा समावेश होता.हवाई दलाच्या स्थापनेच्या 4.5 वर्षानंतर हवाई दलानं पहिलं ऑपरेशन सुरु केलं. त्यानंतर भारतीय वायुसेनेनं बंडखोर भिट्टानी आदिवासींविरोधातील कारवायांमध्ये भारतीय सैन्याला मदत करण्यासाठी उत्तर वजीरिस्तानमधील मीरानशहाबरोबर पहिल्यांदा युद्धात भाग घेतला. मात्र, दुसऱ्या महायुद्धापर्यंत भारतीय हवाई दलाची ताकद वाढत गेली. या दलात 16 अधिकारी आणि 662 एअरमन वाढले.भारतीय हवाई दल हे आता जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मजबूत सैन्य मानले जाते. त्याने आत्तापर्यंत अनेक जबरदस्त मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. याचे बोधवाक्य गीतेतून घेतले गेलेय, जे "नभः स्पृशं दीप्तम्" असं आहे. याचा अर्थ, अभिमानानं निळ्या आकाशाला स्पर्श करणं, असा होतो.स्वातंत्र्यापूर्वी भारतीय हवाई दल रॉयल इंडियन एअर फोर्स (RIAF) म्हणून ओळखले जात होते. स्वातंत्र्यानंतर, जेव्हा पूर्ण प्रजासत्ताक अस्तित्वात आले, तेव्हा 'रॉयल' हा शब्द वगळण्यात आला आणि फक्त भारतीय वायुसेना असं नाव ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यापूर्वी हवाई दल लष्कराच्या अखत्यारीत आले, ज्याची स्वतंत्र शाखा निर्माण करण्याचे श्रेय एअर मार्शल सर थॉमस डब्ल्यू एल्महर्स्ट यांना दिले जाते. त्याचे पहिले भारतीय प्रमुख चीफ मार्शल सुब्रतो मुखर्जी होते.भारतीय हवाई दलाकडे सध्या 7 कमांड आहेत. याचे मुख्यालय दिल्लीत आहे. याच्या पदांचा क्रम रॉयल एअर फोर्समध्ये पूर्वीसारखाच होता. त्याच्या सर्वात कमी रँकवर फ्लाइट कॅडेट आहे, त्यापेक्षा वर फ्लाइंग ऑफिसर, फ्लाइंग लेफ्टनंट, स्क्वाड्रन लीडर, विंग कमांडर, ग्रुप कॅप्टन, एअर कमोडोर, एअर व्हाइस मार्शल, एअर मार्शल, एअर चीफ मार्शल आहेत. खरं तर, एअर चीफ मार्शल हे हवाई दलाचे प्रमुख आहेत.हवाई दलाच्या 7 कमांडमध्ये 5 ऑपरेशनल आणि 2 फंक्शनल कमांड आहेत. हे मुख्यालय मेंटेनन्स कमांड नागपूर, मुख्यालय प्रशिक्षण कमांड बेंगळुरू, मुख्यालय ईस्टर्न एअर कमांड शिलाँग, मुख्यालय वेस्टर्न एअर कमांड नवी दिल्ली, मुख्यालय सेंट्रल एअर कमांड अलाहाबाद, मुख्यालय दक्षिण एअर कमांड तिरुअनंतपुरम आणि मुख्यालय दक्षिण-पश्चिम हवाई कमांड गांधी नगर येथे आहे.हवाई दलाचा ध्वज निळ्या रंगाचा आहे, पहिल्या भागात राष्ट्रीय ध्वज आणि मध्यभागी राष्ट्रीय ध्वजाच्या तीन रंगांनी बनलेले वर्तुळ आहे. ध्वजाचे चिन्ह वायुसेनेच्या चिन्हांपेक्षा वेगळे आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.