चीनने पुन्हा सीमावाद उकरून काढत नव्या वर्षाच्या प्रारंभी गलवान खोऱ्यात झेंडा फडकावल्याने भारतात राजकीय (Politics) आरोप सुरू झाले आहेत.
मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा चालविला असून चीनला भारतीय सीमेबाहेर कधी घालवणार असा सवाल काँग्रेसने केला आहे. भारतीय आणि चीनी सैनिकांच्या हिंसक झटापटीमुळे चर्चेत आलेल्या गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी झेंडा लावत एकही इंच भूभाग न सोडण्याचा इशारा देणारा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता भारतीय सैनिकांचाही आता तिरंगा फडकावतानाचे फोटो आज समोर आले आहेत.
चीनने झेंडा फडकावत आव्हान दिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी ट्विट करून पंतप्रधान मोदींना आता तरी मौन सोडा, असे खोचक आवाहन केले होते. गलवानमध्ये आपला तिरंगाच शोभतो. चीनला प्रत्युत्तर द्यायलाच हवे, असेही राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
यापूर्वी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीन सरकारने नवीन सीमा कायदा लागू करण्याच्या दोन दिवस अगोदर आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांचे "नामांतर" करण्याचा प्रयत्न केला होता.
भारत सरकारने गेल्या गुरुवारी सांगितलंय की, चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे स्वतःच्या भाषेत बदलण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या पाहिल्या आहेत आणि असं ठामपणे सांगितलंय की, सीमावर्ती राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील आणि नवी नावं दिल्यानं वस्तुस्थिती बदलत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.