World Famous Cricketers esakal
भारताच्या 'या' खेळाडूंनी सलग सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.
वेस्ट इंडिजचा महान अष्टपैलू खेळाडू सर गॅरी सोबर्स (Gary Sobers, West Indies) यांनी 31 ऑगस्ट 1968 रोजी सहा चेंडूत सलग सहा षटकार ठोकले. अशी कामगिरी करणारा सोबर्स जगातील पहिला फलंदाज होता. मॅल्कम नेशच्या चेंडूवर त्यांनी हे सहा षटकार ठोकले. या खेळीत त्यांनी नाबाद 76 धावा केल्या.इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्सनं (Alex Hales, England) नॉटिंगहॅमशायरसाठी 2015 च्या नॅटवेस्ट T20 स्पर्धेत वॉर्विकशायरविरुद्ध सलग सहा षटकार ठोकले. हेल्सनं वेगवान गोलंदाज रॉयड रँकिनच्या सलग दोन षटकात 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता.2007 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हर्शल गिब्सनं (Herschelle Gibbs) नेदरलँडचा फिरकी गोलंदाज व्हॅन बुंगेलाला एका षटकात 6 षटकार ठोकले. वनडेमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू आहे.अफगाणिस्तानचा युवा फलंदाज हजरतुल्ला झझाईनं (Hazratullah Zazai, Afghanistan) 2018 मध्ये अफगाणिस्तान प्रीमियर लीगमध्ये काबुल जवानकडून खेळताना बाल्खचा दिग्गज फिरकी गोलंदाज अब्दुल्ला मजारीच्या षटकात 6 षटकार ठोकले.भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानं (Ravindra Jadeja, Indian Cricketers) डिसेंबर 2017 मध्ये सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरजिल्हा T20 स्पर्धेत सलग सहा चेंडूंमध्ये सहा षटकार ठोकले होते. नीलम वामजाच्या चेंडूवर त्यानं हे सहा षटकार ठोकले.रवी शास्त्री (Ravi Shastri, Indian Cricketers) यांनी 1985 मध्ये सलग सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. बॉम्बे आणि बडोदा यांच्यात खेळल्या जात असलेल्या प्रथम श्रेणी सामन्यात शास्त्रींनी बडोद्याचा डावखुरा फिरकी गोलंदाज तिलक राजच्या चेंडूवर सहा षटकार ठोकले.भारताचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू (Indian Cricketers) युवराज सिंगनं (Yuvraj Singh) 2007 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-ट्वेंटी विश्वचषकात इंग्लंडचा स्टार गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात 6 षटकार ठोकलं होते. यादरम्यान त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान (12 चेंडूत) अर्धशतकही ठोकलं.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.