Indian women hockey team creates history at the Tokyo Olympics by entering the semifinals for the first time
भारतीय महिला हॉकी संघाने Tokyo Olympics मध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरीत दाखल होत नवा इतिहास रचला आहे
जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या ऑस्ट्रेलिया संघाचा 0-1 अशा फरकाने पराभव करत भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघानी समान खेळ केला. भारत आणि ऑस्टेलिया संघाना गोल करण्यात अपयश आलं. मात्र, पहिला हाप संपण्यापूर्वी भारतीय संघाने आपला खेळ उंचावला.
गुरजित कौर हिने दुसऱ्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये परावर्तित करत भारताला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखण्यात भारतीय संघाला यश आलं. अखेरच्या चौथ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार हल्ले करत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय महिला संघाने सर्व हल्ले परतवून लावले.भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला सडेतोड उत्तर देत एकही गोल होऊ दिला नाही.
सात पेनल्टी कॉर्नरचा भारतीय महिला हॉकी संघाने यशस्वी बचाव केला. या विजयासह टोकियो म्पिकमध्ये पदक मिळवण्याच्या दिशेन भारतीय संघाने पाऊल टाकलं आहे.बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने केलेल्या प्रत्येक हल्ला भारतीय महिला हॉकी संघाने परतवून लावला.
TokyoOlympics मध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरीत दाखल झाल्यानंतर विजयाचा जल्लोष साजरा करताना भारतीय महिला हॉकी संघ.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.