पॉप्युलर व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने भारतीय अर्थव्यवस्थेचा राष्ट्रीय उत्पादनाचा दरामध्ये ( GDP) मोठे योगदान दिले आहे. एका अहवालाननुसार भारताच्या GDP मध्ये २०२०मध्ये युट्यूबचे योगदान ६८०० कोटी रुपये इतके आहे. याबाबत 'ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स' या स्वतंत्र फर्मने ही माहिती दिली आहे.
अहवालामध्ये युट्यूबच्या क्रिएटर इकोसिस्टी दर्शविण्यात आली आहे. यामध्ये सांगितलेल्या युट्यूबने ६,८३,९०० फुल टाईम जॉब इक्वेव्हॅलेंटला सपोर्ट केला आहे. APAC, YouTube Partnerships ज्या रिजनल डायरेक्टर अजय विद्यासागरने सांगितले की, देशाच्या क्रिएटर इकॉनॉमीमध्ये नोकरीची संधी, अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रभावित करण्याची क्षमता आहे.भारतामध्ये १ लाखांपेक्षा जास्त सब्सक्राईबर्स असलेले ४०,०० युट्यूब चॅनल्स निर्माण झाले आहे. ही वार्षिक वाढ 45% आहे. बहूतेक भारतीय YouTube निर्माते या प्लॅटफॉर्मद्वारे संधी मिळवत असून आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत.ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या सीईओ एड्रियन कूपर(CEO Adrian Cooper)ने सांगितले की, भारतामध्ये युट्यूब इकोसिस्टीच्या आर्थिक, सामजिक, सांस्कृतिक परिणाम Unpack करणारा आणि मोजमाप करणार पहिला अहवाल आहे.भारतामधील ८० टक्के क्रिएटिव्ह उद्योजकांनी सांगितले की, या प्लॅटफॉर्मने त्यांच्या व्यावसायिक लक्ष्यावर सकारात्मक परिणाम केला आहे. युट्यूबवर आपल्या क्रिएटर्सला ८ वेग-वेगळ्या पद्धती मॉनिटाईज करण्यासाठी देतोयुट्यूब चॅनल्स ज्या ६ अंकी किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न निर्माण करत आहे त्यांच्या संख्येत ६० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे असा दावा या अहवालात केला आहे. काही क्रिएटर्सनेही असा दावा केला की, युट्यूबने त्यांना जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याची संधी मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.