30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. आपल्या क्रेझी फ्रेंडशिपला साजर करण्यासाठी विशिष्ट तारखेची गरज नसली तरी, हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपल्या आयुष्यात त्यांच्या असण्याच महत्त्व किती आहे. esakal
1) शोले
सर्वकालीन क्लासिक, शोले दोन मित्र, जय आणि वीरू यांचा प्रवास दाखवतो. मैत्रीची परिपूर्ण व्याख्या सांगणारे गाणे 'ये दोस्ती हम नहीं छोडेंगे' याच चित्रपटातील आहे.2) दिल चाहता है
या चित्रपटात मैत्रीची व्याख्या बदलली आहे. आकाश, समीर आणि सिद्धार्थ त्यांच्या बाँडमधील खडतर प्रसंगांचा सामना केल्यानंतर पुन्हा एकत्र येतात. प्रत्येकजण चित्रपटाशी वैयक्तिक पातळीवर जोडलेला आणि संबंधित आहे. हा चित्रपत्र पाहणाऱ्यामध्ये एक ओढ निर्माण करतो.3) 3 इडियट्स
हा चित्रपट फरहान, राजू आणि रॅंचो यांच्यातील मैत्रीचे प्रतीक आहे. चांगल्या मित्राचा प्रभाव तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यास मदत करू शकतो. चित्रपटात दाखवण्यात आलेला निखळ साधेपणा आणि विक्षिप्तपणा सर्वांनाच भावतो. हा चित्रपट तुम्हाला भावनिक बनवून जातो.4) रॉक ऑन!
‘रॉक ऑन!’ चार मित्रांची आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगते. त्यांच्या संगीताच्या वेडामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारा बँड सुरू होतो. पुन्हा ते गैरसमजानंतर वेगळे होतात.5) जाने तू या जाने ना
हा चित्रपट जय आणि अदिती आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपची मैत्री दर्शवतो. जय आणि अदिती यांच्यातील बंधच प्रेमात फुलतात. मैत्री, प्रेम, रूसवे आणि निखळ मैत्री यांची परिपूर्ण व्याख्या हा चित्रपट दर्शवतो.6) हेरा फेरी
या चित्रपटात राजू-श्याम-बाबुराव मैत्रीने चित्रपटात भरपूर प्लॅनिंग करून आणि अधिक पैसे कमावण्याच्या षडयंत्रात हशा-दंगा निर्माण करतात.7) ये जवानी है दिवानी
ये जवानी है दिवानी ही मैत्री आणि प्रेमाची कहाणी आहे. हा चित्रपट शिकवून जातो की, जीवनात तुमच्याकडे सर्व काही असू शकते आणि तुमच्या आजूबाजूला मित्र नसल्यास एकटेपणा जाणवतो.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.