International Yoga Day esakal
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2015 पासून दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो.
International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिवस 2015 पासून दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. या वर्षीच्या योग दिनाची थीम "मानवतेसाठी योग" अशी आहे. भारतात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) म्हैसूर पॅलेस मैदानावर सामूहिक योग प्रात्यक्षिकात भाग घेतला होता. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 75 केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशभरात 75 ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भाग म्हणून सोमवारी संध्याकाळी नायगारा फॉल्समध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नायगारा फॉल्स स्टेट पार्कमधील आयलंड इथं हा कार्यक्रम आयोजित केला होता. यादरम्यान संबंधित स्वयंसेवकांनी सामूहिक योगासनं केली.भारताचा शेजारील देश नेपाळमध्ये (Nepal) देखील आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नेपाळची राजधानी काठमांडू येथील धरहरा टॉवर इथं 'योगा फॉर ह्युमॅनिटी' या थीमचा संदेश सुंदर दिव्यांच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी सामूहिक योगासनंही करण्यात आली.
सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) योगाची क्रेझ पहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दुबईमध्ये योगासन करण्यात आली.भारतातील वाळू कलेसाठी प्रसिद्ध असलेले वाळू कलाकार सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik) यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला पुरी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक भव्य वाळू शिल्प साकारलंय. ज्यावर सूर्यनमस्काराची मुद्राही दाखवलीय.चीनच्या (China) उत्तरेकडील हेबेई प्रांतातील हांडन येथील एका उद्यानात लोक योगासनं करत आहेत.ब्राझीलमधील (Brazil) पीस सेंटरमध्ये योगा करताना लोक दिसत आहेत.आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी मस्कत (Muscat) येथील भारतीय दूतावासानं सोमवारी 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत 'मस्कत योग महोत्सव' शिबिराचं आयोजन केलं होतं. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी ट्विट करून ही माहिती दिली.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.