भारताला जगभरात 'मधुमेहाची राजधानी' म्हणून ओळखलं जातं. आकडेवारीनुसार, इथले 50 मिलियनहून अधिक (5 कोटी) लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत.
भारताला जगभरात 'मधुमेहाची राजधानी' म्हणून ओळखलं जातं. आकडेवारीनुसार, इथले 50 मिलियनहून अधिक (5 कोटी) लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. हे खरंच देशासाठी एक मोठं आव्हान आहे. मधुमेह हा एक गंभीर रोग असून यामुळे शरीर आतून पोकळ बनत जातं. मधुमेहावरील उपचारासाठी पद्धती आणि औषधे सर्व वैद्यकीय यंत्रणेमध्ये उपलब्ध आहेत. पण, आज आपण कोणतेही औषध न घेता या गंभीर आजारावर नियंत्रण ठेवण्याच्या मार्गाविषयी सांगणार आहोत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, आज आम्ही तुम्हाला योगाविषयी माहिती सांगणार आहोत, ज्याने तुम्ही योगासनाव्दारे मधुमेहावर सहज मात करु शकता. मधुमेह (Diabetes) आणि योग : योग तज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशी अनेक आसनं आहेत, जी रोजच्या-रोज योग्य पद्धतीने सराव करून मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. टाइप-2 डायबिटीज झाल्यास 'योगा'कडून बरेच फायदे मिळू शकतात. योगा केल्याने शरीराला खूप आराम मिळतो. शिवाय याचा स्वादुपिंडवरही परिणाम जाणवतो.चक्रासन (Chakrasana) : चक्रासन एक योगासन आहे. याची प्रक्रिया अशी जमिनीवर उताणे झोपतात. दोन्ही पायदुमडून नितंबाजवळ आणतात. दोन्ही पायातले अंतर चार ते सहा अंगुळे ठेवतात. दोन्ही हात कोपरात दुमडून डोक्याजवळ घेतात. मग पूरक करून कमरेपासून डोक्यापर्यंतचा भाग जमिनीपासून वर उचलतात. डोके शक्य तितके पाठीमागे वळवतात. अशा प्रकारे शरीर चक्रासारखे गोलाकार करतात. या आसनाचा काळ हळूहळू वाढवीत नेतात. याच्या अभ्यासाने तारुण्य दीर्घकाळ टिकून राहते व मधुमेहावरही देखील चांगला उपाय ठरु शकते.धनुरासन (Dhanurasana) : पायात थोडे अंतर ठेऊन पोटावर झोपा. हात शरीरालगत असू द्या. गुडघ्यातून पाय घडी करून हाताने घोटे पकडा. श्वास घेत जमिनीपासून छातीवर उचला आणि पाय वर आणि मागे ढकला. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत सरळ पुढे पहा. शरीरातील ताण वाढेल तसे हास्य देखील वाढू द्या. श्वासावर लक्ष ठेऊन अंतिम स्थितीमध्ये स्थिर राहा. तुमचे शरीर धनुष्याप्रमाणे ताठ बनले आहे. या स्थितीमध्ये विश्राम करत खोल दीर्घ श्वास घेत रहा. परंतु, खूप ताण देऊ नका. पंधरा-वीस सेकंदानंतर श्वास सोडत पाय आणि छाती जमिनीवर आणा. घोटे सोडून विश्राम करा. यामुळे पाठीचे आणि पोटाचे स्नायू बळकट होतात. जननेंद्रियांना संजीवनी मिळते. छाती, गळा आणि खांदे मोकळे होतात. पाय आणि हातांचे स्नायू बळकट होतात व मधुमेहावरही फायदशीर ठरते.मत्स्यासन (Matsyasana) : सुरवातीला पद्मासनात बसा. नंतर याच स्थितीत हळूहळू मागे जमिनीला पाठ टेकवा. लक्षात ठेवा जमिनीला पाठ टेकवत असताना गुडघे जमिनीला लागून असावेत. त्यानंतर मग डोके हळूहळू शरीराच्या दिशेने खाली म्हणजे, पाठीच्या भागाखाली घ्यायला सुरवात करा. त्यासाठी हाताचा आधार घ्या. त्यामुळे शरीराचा वरचा भाग वर होईल. आता हातांनी पायाचे अंगठे पकडा. आता तुमच्या शरीराची अवस्था अशी होईल. डोके पाठीच्या खाली टेकलेले. शरीराचा वरचा भाग वर उचललेला आणि हाताने पायाचे अंगठे पकडलेले. यामुळे तुमच्या पोटावर, छातीवर ताण येईल. चेहर्यावरही ताण येईल. एक ते पाच मिनिटापर्यंत ही आसनस्थिती टिकवायला हवी. त्यानंतर मग पुन्हा सामान्य स्थितीत या. या प्रकारामुळे आपल्या पाठीचा कणा मजबूत होतो व आपले शरीर सदृढ राहते. डिसक्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.