south african town has upside down house tourists get confused esakal
आपल्या आजुबाजूला अनेक विचित्र गोष्टी आहेत. दक्षिण आफ्रिकेतील ब्रॉडरस्ट्रूममध्ये असेच एक विचित्र ठिकाण आहे. जोहान्सबर्गपासून 45 मैलांवर असलेल्या येथे असलेले उलटे घर पाहण्यासाठी अनेकजण येतात. घरात छोटया-छोटया गोष्टी असतील तर मन भरकटते, पण हे सगळं घर उलटं झालंय, म्हणजे खालच्या गोष्टी वरच्या आणि वरच्या खाली.
तुमचा विश्वास बसत नसेल तर या घराचा फोटो बघा, छप्पर कुठे आहे आणि फरशी कुठे आहे हे समजणार नाही. घराचे छप्पर खाली बांधलेले आहे आणि घराचा पाया वरती हवेत असलेला दिसतोय.हे घर ब्राइट कलर्सनी सजवण्यात आले आहे. काही पर्यटकांना याच्या सौंदर्याचे वेड लागले आहे, तर काहींना याच्या आर्किटेक्टचा धक्का बसला आहे. जोहान्सबर्गच्या उत्तरेस सुमारे 75 किलोमीटर अंतरावर, हार्टेबीस्टपोर्ट जवळ हे घर आहे, जे आता या भागातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
येथे आलेले पर्यटक येथे येताच अचंबित होतात आणि आपल्या कॅमेऱ्यात हे अनोखी फोटो टिपतात. येथे घराच्या छताला लोंबकळणारे सोफे आणि खुर्च्या आहेत, इथे उभे राहून कॅमेरा उलटा फिरवताना पूर्णपणे गोंधळात टाकणारे चित्र समोर येते.
गुरुत्वाकर्षणाचा प्रतिकार करण्यासाठी, सर्व घरगुती उपकरणांसह स्वयंपाकघर उलटे केले गेले आहे. बघून तुम्हाला वाटेल की माणसे उलटे उभी आहेत, पण घर उलटे आहे, लोक एकदम सरळ आहेत. हे घर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. या अनोख्या वास्तूची पाहण्याची वेळ सकाळी नऊ ते दुपारी चार अशी ठेवण्यात आली आहे.
गुरुत्वाकर्षणाचा प्रतिकार करण्यासाठी, सर्व घरगुती उपकरणांसह स्वयंपाकघर उलटे केले गेले आहे. बघून तुम्हाला वाटेल की माणसे उलटे उभी आहेत, पण घर उलटे आहे, लोक एकदम सरळ आहेत. हे घर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. या अनोख्या वास्तूची पाहण्याची वेळ सकाळी नऊ ते दुपारी चार अशी ठेवण्यात आली आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.