IPL 2022 Mayanti Langer Sakal
आयपीएल स्पर्धेदरम्यान फिल्ड बाहेरच्या लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक असणारी मयंती लँगर बिन्नी पुन्हा एकदा अँकरिंक करताना चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. जर तिच्याकडे बारकाईने पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ती बारिक होऊन पुन्हा आपल्या कामाला लागलीये. मातृत्वानंतर तिने आपल्या फिटनेसवर कमालीची मेहनत घेतल्याचे दिसून येते. पाहुयात तिचा फिटनेस दाखून देणारे खास फोटो...
आयपीएलमधील लोकप्रिय अँकर मयंती लँगर बिन्नी दोन वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा अँकरिंग करताना दिसत आहे.मातृत्व रजेमुळे ती मागील दोन हंगामात आयपीएलमध्ये अँकरिंग करताना दिसली नव्हती.आयपीएलमध्ये कमबॅक करताना एखादा खेळाडू जसा फिटनेसवर काम करुन संघाला जॉईन होतो. अगदी तसेच चित्र मयंतीच्या बाबतीतही पाहायला मिळते.माृत्वानंतर फिटनेसवर कमालीची मेहनत घेत अगदी बारिक होऊन ती पुन्हा आपल्या कामावर रुजू झालीये.जुने फोटो आणि आत्ताचे फोटा पाहिल्यानंतर एखाद्याला तिने किती किलो वजन घटवलंय आणि तिच्या फिटनेसच राज काय? असा प्रश्न पडला तर नवल वाटू नये. मयंती लँगर पुन्हा अँकरिंगसाठी सज्ज झाल्यानंतर तिने पुन्हा एकदा आपल्या कामाच्या ठिकाणचे खास फोटो शेअर करायला सुरुवात केलीय आहे. तिचा बदललेला लूक आणि स्लीम फिटनेसची झलक चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.