Chennai Super Kings sakal
फोटोग्राफी

IPL 2022 Mega Auction | चेन्नईत होणार या 5 खेळाडूंची घरवापसी?

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएल 2022 लिलावापूर्वी (IPL 2022 Mega Auction) प्रत्येक संघाला फक्त 4 खेळाडूच रिटेन करण्याची मुभा दिल्याने चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स या दमदार खेळाडूंचा भरणा असलेल्या संघांची गोची झाली होती. सीएसकेने रविंद्र जडेजा, एमएस धोनी, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड हे चार खेळाडू रिटेने केले. चेन्नईला आपले अनेक दमदार शिलेदार रिलीज करावे लागले होते. मात्र आता सीएसकेने बंगळुरूमध्ये 12 आणि 13 फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावात आपल्या जुन्या शिलेदारांना परत आणण्यासाठी कंबर कसली आहे. सीएसके (CSK) जवळपास 5 जुन्या खेळाडू पुन्हा आपल्या गोटात खेचण्याच्या तयारीत आहे. चेन्नईच्या पाकिटात 48 कोटी शिल्लक राहिले आहेत.

फाफ ड्युप्लेसिस (बेस प्राईस 2 कोटी) : दक्षिण आफ्रिकेचा 37 वर्षाचा फाफ ड्युप्लेसिस (Faf du Plessis) पुन्हा एकदा सीएसकेकडून खेळण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्ज त्याला पुढच्या तीन आयपीएल हंगामासाठी आपल्याकडे ठेवण्याची शक्याता आहे. त्याने आयपीएलमध्ये 100 सामन्यात 2935 धावा केल्या आहेत. यात 22 अर्धशतकांचा सामावेश आहे.
दीपक चहर (बेस प्राईस 2 कोटी) : दीपक चहर (Deepak Chahar) हा सीएसकेच्या वेगावान गोलंदाजीचा कणा राहिला आहे. आता तो भारतीय संघात देखील निवडला गेला असल्याने सीएसके असा हुकमी एक्का पुन्हा आपल्या कळपात सामिल करून घेण्यासाठी चांगलाच जोर लावण्याची शक्यता आहे. चहरने धोनीच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये 63 सामन्यात 59 विकेट घेतल्या आहेत.
ड्वेन ब्राव्हो (बेस प्राईस 2 कोटी) : चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) सारखा व्हेरिएशन असलेला गोलंदाज कायम धोकादायक असतो. त्यामुळेच चेन्नईने जरी त्याला रिलीज केले असले तरी ते पुन्हा एकदा ब्राव्होला आपल्या संघात घेण्यासाठी नक्कीच बोली लावलीत. याचबरोबर तो फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात देखील आपले चांगले योगदान देऊ शकतो. त्याने आयपीएलमध्ये 151 सामने खेळत 1537 धावा केल्या आहेत. तर 167 विकेट देखील घेतल्या आहेत.
शार्दुल ठाकूर (बेस प्राईस 2 कोटी) : सीएसके शार्दुल ठाकूरसाठी (Shardul Thakur) देखील आपली पैशाची पोतडी खोलू शकतात. गेल्या काही हंगामापासून शार्दुल ठाकूरने चेन्नईसाठी काही मॅच विनिंग खेळी केल्या आहे. त्याची मोक्याच्या क्षणी विकेट घेण्याची क्षमता जबरदस्त आहे. त्यामुळे सीएसके त्याच्या अष्टपैलूत्वाचा फायदा घेण्यासाठी त्याला पुन्हा आपल्या संघात सामिल करून घेऊ शकते. त्याने 67 आयपीएल सामन्यात 61 विकेट घेतल्या आहेत.
सुरेश रैना (बेस प्राईस 2 कोटी) : मिस्टर आयपीएल म्हणून बिरूदावली मिरवणाऱ्या सुरेश रैनासाठी (Suresh Raina) देखील चेन्नई प्रयत्न करू शकते. जरी रैना 34 वर्षाचा झाला असला तरी त्याने 205 आयपीएल सामन्यात 5528 धावा केल्या आहेत. तो धोनीबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. बहुदा तो आयपीएलमधून देखील धोनीबरोबरच निवृत्त होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT