IPL 2022 Mega Auction Player Predication Top 10 Indian Fastest Bowlers and franchise  sakal
फोटोग्राफी

IPL 2022 Auction : 'दस का दम' लिलावात या गोलंदाजांचा दिसेल बोलबाला!

Kiran Mahanavar

क्रिकेटच्या लव्हर्समध्ये आता आयपीएल 2022 चा फिव्हर दिसू लागला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 12 आणि 13 तारखेला आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. आगामी आयपीएलच्या हंगामात नव्या दोन संघांचा समावेश झाल्याने स्पर्धेतील संघाचा आकडा 10 वर पोहचला आहे. मजबूत संघ बांधणी करण्यासाठी 10 फ्रेंचायझी संघ आपापल्या ताफ्यात दमदार गोलंदाजांना घेण्यासाठी प्रयत्नशील असतील. मेगा लिवावात कोणाला भाव मिळणार आणि कोणत नाव फुसका बार ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जाणून घेऊयात असे 10 भारतीय गोलंदाज ज्यांच्यासाठी 10 फ्रेंचायझीमध्ये मेगा लिलावाच्या व्यासपीठावर रंगेल सामना....

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना दिसलेला हर्षल पटेलनं IPL 2021 च्या हंगामात सर्वाधिक विकेट घेत लक्षवेधून घेतलं होते. यंदाच्या IPL 2022 मेगा लिलावात तो फ्रेंचायझीची सर्वोत्तम पसंती दिसू शकतो.
दीपक चाहरला CSK ने 2018 मध्ये आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते. त्य़ानंतर 2019 मध्ये त्याने IPL मधील सर्वोच्च वैयक्तिक कामगिरी नोंदवली. गेल्या दोन आयपीएलमध्ये तो नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात त्याने लक्षवेधी कामगिरी करुन दाखवली आहे. या कामगिरीच्या जोरावर तो पुन्हा चर्चेत आला तर नवल वाटू नये.
दिल्ली कॅपिटल्सनं 2018 च्या IPL हंगामात 75 लाख मोजून आपल्या ताफ्यात सामील केलेला आवेश खानही चर्चित गोलंदाजातील एक चेहरा असेल. आवेश खानमध्ये मॅचला कलाटणी देण्याची क्षमता आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळथाना त्याने आपल्यातील स्कील दाखवून दिले आहे. त्यालाही आयपीएलच्या मेगा हंगामात चांगली किंमत मिळू शकते.
चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून खेळणारा शार्दुल ठाकूर हा गोलंदाजीसह फलंदाजीतील लॉर्ड कामगिरीनं सध्या चर्चेत आहे. मोक्याच्या क्षणी विकेट घेण्यासोबतच गरज पडल्या दमदार फटकेबाजीनं सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असल्यामुळे शार्दुल ठाकूरवर मेगा लिलावात पैशांची बरसात होऊ शकते.
भारतीय संघातील अनुभवी आणि प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीवरही फ्रेंचाझीच्या नजरा असतील. पंजाब किंग्जनं त्याला रिटेन केलं नसलं तरी ते पुन्हा त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेऊ शकतात. याशिवाय अन्य फ्रेंचायझीही त्याच्यासाठी अधिक पैसा ओतायला तयारी दाखवताना दिसू शकते.
विदर्भाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव आतापर्यंत वेगवेगळ्या फ्रेंचायझीकडून मैदानात उतरला. पण गत हंगामात दिल्लीकडून खेळताना त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. यंदाच्या हंगामात लखनऊ, पंजाब आणि चेन्नई त्याच्यावर डाव लावणार असल्याची चर्चा रंगली आहे. जर ही गोष्ट खरी ठरली तर विदर्भाच्या पोट्याला चांगला भाव मिळू शकतो.
इशांत शर्माला 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून 13 विकेट्स घेतल्या पण त्यानंतर तो फारसा प्रभावी ठरताना दिसले नाही. त्याची कामगिरी जेमतेम असली तरी मेगा लिलावात तो फ्रेंचायझीच्या सर्वोत्तम पसंतीपैकी एक असेल हे निश्चित.
आयपीएलमधील कामगिरीनं भारतीय संघाचे दरवाजे उघडलेल्या प्रसिद्ध कृष्णाही या शर्यतीत आहे. युवा गोलंदाजाने अल्पावधीत नावाप्रमाणेच प्रसिद्धी मिळवली आहे. यंदाच्या हंगामात त्याच्यावर कोणता संघ बोली लावणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारतीय गोलंदाज टी नटराजन याने 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. गत हंगामात दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. हैदराबाद पुन्हा त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेणार की तो नव्या संघाकडून मैदानात उतरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार 2014 IPL पासून सनरायझर्स हैदराबादकडून खेळतोय. त्याच्या कामगिरीत धार थोडी कमी झालीये. या परिस्थितीतही अनुभवाच्या जोरावर त्याला चांगला भाव मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT