Kaviya Maran And Dhanashree Verma Sakal
आयपीएलच्या 15 व्या हंगामात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील स्टेडियमला 15 सामन्यांचे यजमानपद मिळाले आहे. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील पहिला सामना पुण्याच्या मैदानात खेळवण्यात आला. खेळाडूंच्या बहरदार खेळीशिवाय या सामन्यात स्टेडियमच्या व्हिआयपी स्टँडमधील सौंदर्यवतींनी सर्वांचे लक्ष वेधलं. हैदराबादकडून संघाची मालकीण काव्या मारन (Kaviya Maran) तर राजस्थानकडून फिरकीपटू युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांनी सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर हजेरी लावली होती. पाहूयात सामन्यादरम्यानचे काही खास फोटो.... सनरायझर्स हैदराबादची मालकीण असलेली काव्या मारन आयपीएलमध्ये आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थिती लावत असते.
सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्यानंतर काव्या मारन पुन्हा एकदा चर्चेत आलीये. पुण्यातील सामन्यात हैदराबादच्या संघाला प्रोत्साहन देणाऱ्या काव्या मारन हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.दुसऱ्या बाजूला राजस्थानच्या ताफ्याला प्रोत्साहन देण्यासाठी युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा पुण्याच्या स्टेडियमवर उपस्थितीत राहिल्याचे पाहायला मिळाले.राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात बटलर तुफान फटकेबाजी करताना काव्या मारन हिरमोड झाला होता. पण ज्यावेळी उमरान मलिकने त्याची विकेट घेतली त्यावेळी काव्या मारनच्या चेहऱ्यावरील भाव बदलल्याचे पाहायला मिळाले.पुण्यातील स्टेडियमवर पिंक ड्रेसमध्ये धनश्री वर्माचे सौंदर्य आणखीनंच खुलन दिसत होते. तिने व्हिक्टी साइन दाखवत राजस्थान रॉयल्स संघाच्या विजयाचा आनंद साजरा केल्याचे पाहायला मिळाले. काव्या मारन दाक्षिणात्य व्यावसायिक के मारन यांची कन्या आहे. सन नेटवर्कच्या मालक असलेल्या मारन यांच्या कन्येकडेच सनरायझर्स हैदराबाद संघाचा कारभार आहे. आयपीएलच्या लिलावातही ती पुढाकार घेताना दिसली आहे. सनरायझर्स हैदराबादची मालकीण असलेली काव्या मारन आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थिती लावत असते. याआधीही स्टेडियममध्ये हजेरी लावून तिने क्रिकेट चाहत्यांना घायाळ करुन सोडल्याचे पाहायला मिळाले आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.