IPL Final Those Who Have Ability To Turn Around Match Single Handedly esakal
अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या हंगामाची फायनल रविवारी ( दि. 29) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हे दोन्ही संघ आयपीएलची लीग स्टेज संपली त्यावेळी गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होते. या दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी करून इथंपर्यंत मजल मारली होती. गुजरात आणि राजस्थान या दोन्ही संघामध्ये मॅचविनर खेळाडूंचा भरणा आहे. अशाच एकहाती सामन्याचे चित्र पालटू शकणाऱ्या दोन्ही संघातील खेळाडूंवर नजर टाकूयात.
ट्रेंट बोल्ट
यंदाच्या हंगामात ट्रेंट बोल्टने जरी फार प्रभावी मारी केला नसला तरी तो अव्वल दर्जाचा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तो डावच्या सुरूवातीलाच प्रतिस्पर्धांना मोठे धक्के देऊ शकतो. त्याने आतापर्यंत हंगामात 15 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 8.29 इतका आहे. राहुल तेवतिया
गुजरातच्या संघात अजून एक धोकादायक फलंदाज आहे. तो म्हणजे राहुल तेवतिया. त्याच्याकडे सामना शेवटच्या षटकापर्यंत नेऊन शांतीत क्रांती करण्याची क्षमता आहे. तो दबावात देखील शांत चित्ताने डोकं लावून बॅटिंग करतो. सामना प्रतिस्पर्ध्याच्या पारड्यातून आपल्या पारड्यात अलद आणण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. त्याने हंगामात 12 डावात 271 धावा केल्या आहेत.डेव्हिड मिलर
गुजरातचा हा धडाकेबाज फलंदाज यंदाच्या हंगामात आपल्या जुन्या रंगात दिसत आहे. त्याने आतापर्यंत 15 सामन्यात 449 धावा चोपल्या असून तो मॅच फिनिशर म्हणून आपली जबाबदारी उत्तम प्रकारे निभावत आहे. फायनलमध्ये मिलर धमाका करू शकतो.राशिद खान
गुजरातचा हा फिरकीपटू फलंदाजांना खिळ घालण्यात तरबेज आहे. त्याने हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 15 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. यंदाच्या हंगामात त्याच्या टिच्चून माऱ्याबरोबरच जोडीला त्याचा शेवटच्या षटकातील दांडपट्टा देखील प्रभावी ठरत आहे. हार्दिक पांड्या
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या आपल्या संघाचे चांगल्या पद्धतीने नेतृत्व करत आहे. याचबरोबर तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत गुजराच्या डावाला आकार देखील देतोय. विशेष म्हणजे तो आता गोलंदाजीही करू लागला आहे. अजून एक खास बाब म्हणजे तो आपल्या होम स्टेट आणि होम ग्राऊंडवर खेळणार आहे. त्याने 14 सामन्यात 453 धावा केल्या आहेत.
संजू सॅमसन
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला यंदाच्या हंगामात मोठी खेळ करण्यात जर अपयश आले असले तरी त्याने 16 सामन्यात 444 धावा केल्या असून त्यात दोन अर्धशतकांचा देखील समावेश आहे. त्याच्याकडेही विस्फोटक फलंदाजी करून सामन्याचा नूर पालटण्याची दांडगी क्षमता आहे.
जॉस बटलर
जॉस बटलरने यंदाच्या हंगामात 16 सामन्यात 824 धावा केल्या आहेत. यात चार शतकांचा समावेश आहे. सलामीला येणारा बटलर एकटा प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचा धुव्वा उडवण्यास सक्षम आहे. युझवेंद्र चहल
युझवेंद्र चहलने यंदाच्या हंगामात आपल्या फिरकीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने 16 सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. अहमदाबदच्या फिरकीला थोडीफार मदत असणाऱ्या खेळपट्टीवर तो प्रभावी ठरू शकतो. तो भागीदारी तोडण्यात माहिर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.